शहरं
Join us  
Trending Stories
1
मधुरिमाराजेंची लढण्यापूर्वीच माघार, काँग्रेस आता राजेश लाटकरांना पाठिंबा देणार?
2
"महायुतीत मुख्यमंत्री पदासाठी कुठलीही रस्सीखेच नाही, सर्व काही ठरलेले"; फडणवीस स्पष्टच बोलले
3
राज्यात ‘एमआयएम’चे १५ उमेदवार, एकाला पाठिंबा, मुस्लिम मतविभाजन टाळण्यासाठी कमी उमेदवार
4
आजचे राशीभविष्य, ५ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, अपूर्ण कामे तडीस जातील
5
शेअर बाजारात सलग दुसऱ्या घसरणीसह सुरुवात; Nifty च्या 'या' स्टॉक्समध्ये जोरदार विक्री
6
अमेरिका आज निवडणार नवा राष्ट्राध्यक्ष, ट्रम्प-हॅरिस यांच्यात हाेणार ऐतिहासिक लढत
7
"तुम्ही सरळ जसप्रीत बुमराहला कॅप्टन करा अन् रोहित शर्माला सांगा..."; सुनील गावसकर यांची संतप्त प्रतिक्रिया
8
Suzlon Shares: वर्षभराच्या उच्चांकापेक्षा २२ टक्क्यांनी घसरला शेअर; खरेदीची संधी की आणखी घसरणार भाव?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: बंडखोर बनणार का 'किंगमेकर'? तब्बल १५७ उमेदवार रिंगणात
10
कोणताही गाजावाजा न करता 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने साधेपणाने केलं लग्न, सर्वांकडून कौतुकाचा वर्षाव
11
Reliance Jio IPO : मुकेश अंबानी केव्हा आणणार देशातील सर्वात मोठा आयपीओ? मोठी अपडेट आली समोर, पाहा संपूर्ण डिटेल्स
12
बार्शीत ५ जरांगे-पाटील समर्थकांची माघार; एकजण मात्र दिवसभर नॉटरिचेबल!
13
श्री गणेशपूजेसाठी पंतप्रधानांनी माझ्या घरी येणे चुकीचे नाही, न्या. चंद्रचूड यांनी स्पष्ट केली भूमिका
14
पाच जिल्ह्यांत महिला ठरणार किंगमेकर, १९ विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांचे मत असेल निर्णायक, रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक महिला मतदार
15
राज्यात बंडखोरीचा सार्वत्रिक उद्रेक, तब्बल १५७ बंडखोर रिंगणात, कुठे कुठे काय स्थिती?
16
बंडखोरांमुळे महायुती आणि मविआलाही जबर धक्के; यंदा वाढणार रंगत
17
ठाण्यात वर्चस्वाची लढाई; १९ मतदारसंघांपैकी सहा ठिकाणी बंडखोरीचे ग्रहण, जिल्ह्यात शिंदेसेना, उद्धवसेनासह भाजपही मोठा भाऊ होण्यासाठी प्रयत्नशील
18
अतुल सावेंसमोर हॅट्ट्रिकचे आव्हान, यंदा इम्तियाज जलील यांच्याशी लढत; मतविभागणीचा फायदा होणार?
19
कार्तिकी यात्रा सोहळा :दिंडीधारकांच्या निवाऱ्यासाठी पंढरपुरात ४५० प्लॉट उपलब्ध, बुधवारपासून प्लॉट नोंदणी सुरू होणार
20
डायमंड कंपनीच्या मॅनेजरचा संशयास्पद मृत्यू, ग्रँटरोडच्या ‘त्या’ खोलीत नेमके घडले काय?

नागपुरात पूनम मॉलची भींत पडून चौकीदार ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 8:58 PM

वर्धमाननगरातील आयनॉक्स पूनम मॉलची भींत आणि सज्जा पडून चौकीदारी करणा-या एका वृद्धाचा करुण अंत झाला.

ठळक मुद्देमहिलेसह तिघे जखमी : मॉलच्या मालक आणि व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा  पोलिसांत गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वर्धमाननगरातील आयनॉक्स पूनम मॉलची भींत आणि सज्जा पडून चौकीदारी करणा-या एका वृद्धाचा करुण अंत झाला.जयप्रकाश रामनाथ शर्मा (वय ६४, रा. हिवरीनगर) असे मृताचे नाव आहे. तर, भींतीच्या मलब्याखाली दबून एका महिलेसह तिघे जखमी झाले. शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली. यामुळे परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली असून, लकडगंज पोलिसांनी या प्रकरणी पूनम मॉलच्या मालकावर गुन्हा दाखल केला आहे.सदोष बांधकामामुळे पूनम मॉलच्या भींतींना पाझर सुटला आहे. परिणामी एक भींत जीर्ण झाली होती. ती कधीही पडू शकते आणि अपघात होऊन कुणाचा जीव जाऊ शकतो, याची जाणीव असूनही पूनम मॉलच्या मालकाने तसेच व्यवस्थापनाने त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शुक्रवारी रात्री ११. ४५ च्या सुमारास जीर्ण झालेली भींत आणि सज्जा कोसळला. यावेळी तेथे जयप्रकाश शर्मा चौकीदारी करीत होते. त्यांच्या अंगावर विटा-सिमेंटचा मलबा पडल्याने ते ठार झाले. तर, मुक्ताबाई रामभाऊ गजभिये (वय ५०, रा. हिवरीनगर झोपडपट्टी) आणि अन्य दोघे जबर जखमी झाले. दरम्यान, मॉलची भींत पडल्याने आणि अन्य भींतींना मोठमोठे तडे गेल्याचे कळाल्याने मॉल समोर नागरिकांनी एकच गर्दी केली. माहिती कळताच लकडगंज पोलीस तसेच अग्निशमन दलाचा ताफा तेथे पोहचला. त्यांनी लगेच बचावकार्य सुरू करून शर्मा आणि मलब्याखाली फसलेल्यांना बाहेर काढले. त्यांना मेयोत हलविण्यात आले. तेथील डॉक्टरांनी शर्मा यांना मृत घोषित केले.या घटनेनंतर मध्यरात्रीपासून मॉलसमोर प्रचंड तणाव निर्माण झाला. पोलीस, अग्निशमन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनीही धाव घेतली. पोलिसांनी संतप्त जमावाला पांगविले. त्यानंतर पहाटेपर्यंत सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आल्या. दरम्यान, गुड्डू जयप्रकाश शर्मा (वय ३१) यांनी दिलेल्या तक्रारीवरून लकडगंज पोलिसांनी पूनम मॉलचे मालक तसेच देखभालीची जबाबदारी असणारांवर कलम ३०४, ३३७, ४२७, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला.मोठा अनर्थ टळलाही दुर्घटना मध्यरात्री घडली म्हणून मोठा अनर्थ टळला. दिवसा ही घटना घडली असती तर मृतकांची तसेच जखमींची संख्या जास्त असती.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूnagpurनागपूर