लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित असलेल्यांना नियमाप्रमाणे लस घेता येत नाही. असे असूनही काही रुग्ण व त्यांचे कुटुंबातील सदस्य लस घेण्यासाठी येत आहे. अशा कोरोनाबाधितांमुळे लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे त्यांनी लसीकरण केंद्रावर येऊ नये असे आवाहन महापौर दयाशंकर तिवारी यांनी केले आहे.
मनपातर्फे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचे नवीन ११ केंद्र उघडण्यात आले आहे. यामध्ये सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत ६० वर्ष वयापेक्षा जास्त नागरिकांना व ४५ ते ५९ वर्षापर्यंतचे विविध आजाराने ग्रस्त नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लसीकरण केंद्रातील प्रतीक्षागृह, लसीकरण गृह, निरीक्षण गृहाची पाहणी करुन लसीकरण लाभार्थ्यांशी संवाद महापौरांनी साधला. यावेळी कोरोना बाधित लसीकरणासाठी येत असल्याची माहिती त्यांना मिळाली.