लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : छोटा ताजबाग आणि परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिर येथील एकूण सात दानपेट्या सील करून जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी दिवसभर ही कारवाई चालली.छोटा ताजबाग व परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिर परिसराच्या मालकीवरून सिनिअर भोसला इस्टेट आणि शिर्के बंधू यांच्यात न्यायालयीन वाद सुरूआहे. त्यामुळे न्यायालयाच्या कोर्ट आॅफ वॉर्डनुसार जिल्हाधिकारी हे या संपत्तीचे संरक्षक आहेत. दरम्यान सिनियर भोसला यांच्याकडून १४ जून २०१८ रोजी न्यायालयात एक अर्ज करण्यात आला. यात छोटा ताजबाग आणि लक्ष्मीनारायण मंदिरातील दानपेट्यांचा दुरुपयोग होत असल्याची तक्रार करीत या दानपेट्या जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्याची विनंती करण्यात आली होती. न्यायालयाने ही बाब मान्य करीत दानपेट्या सील करण्याचे निर्देश दिले. न्यायालयच्या निर्देशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्यावतीने तहसीलदार जीवन बनसोडे यांनी ही कारवाई केली. बनसोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. यात छोटा ताजबाग (दर्गा) येथील चार तर मंदिर परिसरातील तीन दानपेट्या उघडून त्यातील पैशाची मोजणी करून त्या सील करण्यात आल्या आहे.दरम्यान भक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलेल्या दानपेटीतच दान टाकावे, असे आवाहन सिनियर भोसला यांच्यावतीने करण्यात आले आहे.
छोटा ताजबाग येथील दानपेटी जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2018 12:07 AM
छोटा ताजबाग आणि परिसरातील लक्ष्मीनारायण मंदिर येथील एकूण सात दानपेट्या सील करून जिल्हाधिकाऱ्यांच्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत. न्यायालयाच्या निर्णयानंतर शुक्रवारी दिवसभर ही कारवाई चालली.
ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्णयानंतर कारवाई : सात दानपेट्या केल्या सील