कॉटन मार्केटच्या इंदिरा गांधी वस्तीची दुरवस्था
इंदिरा गांधी वस्तीत रस्ता नसल्यामुळे येथील नागरिकांना आपली वाहने उभी करण्यासाठी त्रास होतो. वस्तीच्या आत कचरागाडीही जाऊ शकत नाही. वस्तीतील नागरिक नाल्यात कचरा फेकत असल्याचे चित्र आहे. नाल्याची सफाई करण्यात येत नसल्यामुळे पावसाळ्यात नाल्यातील घाण पाणी नागरिकांच्या घरात शिरते. वस्तीतील रस्ता इतका अरुंद आहे की येथे एकच दुचाकी वाहन जाऊ शकते. एका बाजूने गेल्यानंतर दुसऱ्या बाजूने निघण्यासाठी जागा उपलब्ध नाही. दुसऱ्या बाजूने चबुतरा असल्यामुळे वाहन बाहेर काढता येत नाही.
खाऊ गल्ली असामाजिक तत्त्वांचा अड्डा
खाऊ गल्ली कोरोनामुळे बंद आहे. येथे दुपारपासून रात्रीपर्यंत व्यसनाधीन नागरिक गोळा होतात. रात्री दारू पिल्यानंतर ते बॉटल तलावात आणि परिसरात फेकतात. कारवाई होत नसल्यामुळे असामाजिक तत्व बिनधास्त या परिसरात वावरत आहेत. त्यामुळे गांधीसागर तलावाच्या आजूबाजूला नागरिक आपल्या कुटुंबासह जाण्याचे टाळत आहेत.
.............