नागपूर : कुख्यात गुन्हेगार आणि पावणेदोन कोटी रुपये खंडणी वसुलीचा मास्टर मार्इंड राजू भद्रे याला सोमवारी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याला कोर्टात हजर करून त्याचा २२ फेब्रुवारीपर्यंत पीसीआर मिळवला. खंडणीच्या पावणेदोन कोटींचे काय झाले, त्याचा हिशेब भद्रेकडून पोलीस घेणार आहेत.अजय राऊतचे अपहरण करून जीवे मारण्याची धमकी देत दिवाकर कोतुलवार आणि त्याच्या साथीदारांनी पावणेदोन कोटी रुपयांची खंडणी उकळली होती. नागपुरातील आतापर्यंत सर्वात मोठी खंडणी ठरलेल्या या प्रकरणाचा गुन्हे शाखेचे उपायुक्त रंजनकुमार शर्मा यांनी गुन्हे शाखेच्या पथकाकडून शिताफीने तपास करवून पाच जणांना अटक केली. त्यांच्या जबानीतून या खंडणी प्रकरणाचा मास्टर मार्इंड राजू भद्रे आणि दिवाकर कोतुलवार असल्याचे स्पष्ट झाले. कोतुलवार त्याच्या भावासह फरार आहे. मात्र, पिंटू शिर्के प्रकरणात भद्रे कारागृहात बंद होता. त्याला अटक करण्याची राज्य शासनाकडून गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी मिळवली. सर्व कायदेशीर सोपस्कार पार पाडल्यानंतर भद्र्रेला आज कारागृहातून ताब्यात घेण्यात आले.
कुख्यात राजू भद्र्रे पोलिसांच्या ताब्यात
By admin | Published: February 16, 2016 3:59 AM