शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

नागपूर जिल्ह्यात ७ पंचायत समित्या महिलांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 8:40 PM

जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितींच्या सभापतींचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. यात जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांमध्ये महिलांना सभापती म्हणून संधी मिळणार आहे. १७ जानेवारीला सभापतींची निवड होणार आहे.

ठळक मुद्देपंचायत समिती सभापती आरक्षण जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील १३ ही पंचायत समितींच्या सभापतींचे आरक्षण सोमवारी जाहीर झाले. यात जिल्ह्यातील ७ पंचायत समित्यांमध्ये महिलांना सभापती म्हणून संधी मिळणार आहे. १७ जानेवारीला सभापतींची निवड होणार आहे.८ जानेवारीला निवडणुका पार पडल्यानंतर विजयी उमेदवार सभापतीच्या आरक्षणाच्या प्रतिक्षेत होते. जिल्हा निवडणुक कार्यालयाने सोमवारी तेराही पंचायत समितीचे आरक्षण काढले. नरखेड, सावनेर, पारशिवनी, रामटेक, मौदा, नागपूर ग्रामीण, कुही या पंचायत समितीमध्ये सभापती म्हणून महिलेची निवड होणार आहे. तर काटोल, कळमेश्वर, कामठी, हिंगणा, उमरेड व भिवापूर या पंचायत समितीचे आरक्षण संबंधित प्रवर्गासाठी निघाले असले तरी, पुरुषांसोबत महिला सुद्धा यावर दावा करू शकतात. यंदा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण अनुसूचित जाती महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे जिल्ह्यात महिला राज राहणार हे स्पष्ट झाले आहे.पंचायत समितीच्या सभापतींचे आरक्षण जाहीरनरखेड : सर्वसाधारण महिलाकाटोल : अनुसूचित जातीकळमेश्वर : सर्वसाधारणसावनेर : सर्वसाधारण महिलापारशिवनी : अनुसूचित जाती महिलारामटेक : नामाप्र महिलामौदा : नामाप्र महिलाकामठी : सर्वसाधारणनागपूर ग्रामीण : अनुसूचित जमाती महिलाहिंगणा : नामाप्रउमरेड : अनुसूचित जातीकुही : सर्वसाधारण महिलाभिवापूर : नामाप्रयांना लागणार सभापतीसाठी लॉटरीकाटोल : धम्मपाल खोब्रागडे (राष्ट्रवादी)पारशिवनी : करुणा भोवते (काँग्रेस)उमरेड : रमेश किलनाके (काँग्रेस)भिवापूर : नंदा नारनवरे (अपक्ष)नागपूर ग्रामीण : रेखा वरठी (काँग्रेस )सर्वाधिक संभाव्य उमेदवार नरखेडमध्येनरखेड पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण हे सर्वसाधारण महिला साठी आरक्षित झाले आहे. ही पंचायत समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. पण येथे रश्मी आरघोडे, निलीमा रेवतकर, माया मुढोरीया, अरुणा मोवाडे हे चार उमेदवार उमेदवार आहे. कळमेश्वर पंचायत समितीवर काँग्रेसच्या ताब्यात असून, येथे धापेवाडा गणातील जयश्री वाळके व उबाळी गणातील वंदना बोधाने या संभाव्य उमेदवार आहे. सावनेर पंचायत समिती ही काँग्रेसच्या ताब्यात असून, येथे पुष्पा करडमारे व अरुणा शिंदे हे संभाव्य उमेदवार आहे. १० सदस्यांच्या रामटेक पंचायत समितीवर ५ सदस्य काँग्रेसचे निवडून आले असून, येथे काँग्रेसच्या भूमेश्वरी कुंभलकर व कला ठाकरे या संभाव्य उमेदवार आहे.येथे होणार चुरशीची लढत१४ सदस्याच्या हिंगणा पंचायत समितीमध्ये ७ राष्ट्रवादी व ७ भाजपाचे उमेदवार निवडून आले आहे. येथे पंचायत समितीच्या सभापतीचे आरक्षण हे नागरीकांचा मागास प्रवर्ग यासाठी आरक्षित आहे. येथे भाजपाकडून बबिता आंबेडकर व सुरेश काळबांडे तर राष्ट्रवादीकडून बबनराव आव्हाले व अंकिता ठाकरे हे संभाव्य उमेदवार आहे. तर ८ सदस्यांच्या मौदा पंचायत समितीमध्ये काँग्रेसचे ५, भाजप ३ व सेनेचे २ उमेदवार निवडून आले आहे. येथे आरक्षणानुसार सेनेच्या रक्षा थोटे व काँग्रेसच्या दुर्गा ठवकर या सभापतीसाठी संभाव्य उमेदवार आहे. त्यामुळे येथे सभापतीच्या निवडीत चुरस निर्माण होणार आहे. ८ सदस्यांच्या कामठी पंचायत समितीत ४ काँग्रेस व ४ भाजप चे सदस्य आहे. आरक्षणानुसार येथे सुमेध रंगारी व दिलीप वंजारी हे काँग्रेसचे संभाव्य उमेदवार आहे. तर भाजपाकडून उमेश रडके हे संभाव्य उमेदवार आहे. कुहीमध्ये ५ भाजप व ३ काँग्रेसचे उमेदवार आहे. येथे आरक्षणानुसार अश्विनी शिवणकर या भाजपाच्या तर मंदा डहारे या काँग्रेसच्या उमेदवार आहे.

टॅग्स :panchayat samitiपंचायत समितीElectionनिवडणूकWomenमहिला