नागपूर : माजी राष्ट्रपती आणि ज्येष्ठ वैज्ञानिक, दिवंगत भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्यावर डाक तिकीट जारी करण्यात आले आहे. सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष भूषण दडवे यांनी यासंदर्भात मागणी करीत पाठपुरावा केला होता, हे विशेष. २७ जुलै २०१५ रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचे निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या नावावर डाक तिकीट जारी करण्यात यावे, अशी मागणी ३ आॅगस्ट २०१५ रोजी दडवे यांनी केली होती. २७ आॅगस्ट रोजी या मागणीचे निवेदन त्यांनी विभागीय आयुक्तांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जिल्हाधिकाऱ्यांमार्फत केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनाही पाठविले होते. पंतप्रधान व गृहमंत्री यांच्यासह केंद्रीय रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांच्या पाठबळामुळे अखेर १५ आॅक्टोबर २०१५ रोजी डाक विभागाने तिकीट जारी केले.(प्रतिनिधी)
अब्दुल कलाम यांच्यावर डाक तिकीट
By admin | Published: July 26, 2016 2:41 AM