शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दिकींच्या जवळचाच कोणीतरी हल्लेखोरांना माहिती देत होता? पोलिसांना संशय, दोन आरोपी ताब्यात
2
"राज्यातील कायदा सुव्यवस्थेची दुर्दशा..."; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर सुप्रिया सुळेंची पोस्ट
3
बाबा सिद्दिकींना गोळी लागल्याचे कळताच सलमान, संजय दत्त, शिल्पा शेट्टीची रुग्णालयाकडे धाव
4
आजचे राशीभविष्य १३ ऑक्टोबर २०२४; दिलेले पैसे वसूल करता येतील, विवाहेच्छुकांसाठी आशादायी...
5
माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकींची गाेळ्या झाडून हत्या; ३ गोळ्या लागल्या, दोघे ताब्यात
6
मला हलक्यात घेऊ नका, मी पळणारा नाही तर पळवणारा; विधानसभेवर पुन्हा महायुतीचा भगवाच फडकणार - CM शिंदे
7
दोन महिने थांबा, सत्तेत येतोय; कोणालाही सोडणार नाही...; दसरा मेळाव्यात ठाकरेंचे मुख्यमंत्री म्हणूनच ‘प्रोजेक्शन’
8
अंतराळातून टेहळणीसाठी भारत प्रक्षेपित करणार तब्बल ५२ उपग्रह; पाकिस्तान-चीनच्या हालचालींवर ठेवणार करडी नजर
9
दसऱ्याच्या दिवशी ईडीची छापेमारी, रांचीत खळबळ
10
जातीच्या आधारावर संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न; विजयादशमी उत्सवात डॉ. मोहन भागवत यांनी व्यक्त केली चिंता 
11
वेड्यावाकड्या युती अन्‌ आघाड्यांना धडा शिकवा; मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन
12
बांगलादेशमध्ये दुर्गापूजेशी संबंधित ३५ अनुचित घटना, भारताची तीव्र शब्दांत नाराजी
13
पाक-चीन संबंध बिघडविण्यासाठीच ‘ताे’ बाॅम्बस्फाेट
14
गरज पडेल तेव्हा शक्तिनिशी शस्त्रांचा वापर : संरक्षणमंत्री
15
बागमती एक्स्प्रेस दुर्घटना बालासोरसारखीच!
16
ओटीटी कंटेंटवर हवे नियंत्रण, कायदा करा; सिंगल यूज प्लॅस्टिक नको - सरसंघचालक 
17
मागास, वंचितांना त्रास देणाऱ्यांचा हिशेब घेणार; पंकजा मुंडे कडाडल्या; धनंजय मुंडे पहिल्यांदाच दसरा मेळाव्यास हजर
18
या समाजाचा अपमान केला तर उलथवून टाकू; जरांगेंनी दंड थोपटले; नारायणगडावर विराट जनसमुदाय
19
दीक्षाभूमीवर निनादला क्रांतीचा नारा ‘जय भीम’; समतेची मशाल घेत देश-विदेशातून दाखल झाला जनसागर

खड्ड्यांवरून खडाजंगी

By admin | Published: July 21, 2016 1:45 AM

शहरातील डांबरी रस्ते एकाच पावसात उखडले आहेत. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे.

नागपूर : शहरातील डांबरी रस्ते एकाच पावसात उखडले आहेत. रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. या प्रकाराला आळा घालण्यासाठी कंत्राटदारांची नाकेबंदी करून रस्त्यांच्या निकृष्ट कामांची चौकशी करावी. त्यात दोषी आढळल्यास कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे, त्यांच्याविरोधात पोलिसात गुन्हे दाखल करावेत. सोबतच दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे, अशी मागणी करीत महापालिकेतील विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बुधवारच्या सर्वसाधारण खडाजंगी केली. एकूणच आजच्या सभेत ‘खड्डे पे चर्चा’ हाच विषय ऐरणीवर होता. श्रीमंत राजे रघुजीराव भोसले सभागृहात ही सभा आयोजित करण्यात आली होती. शहरातील रस्त्यांवरील गिट्टी व डांबर बाहेर पडून मोठमोठे खड्डे पडल्याने अपघात होत आहेत. तसेच धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून पदाधिकारी व प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत सभागृहात सदस्यांनी हा विषय आक्रमक पणे लावून धरला. विरोधी पक्षनेते विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे, किशोर गजभिये, किशोर डोरले, प्रशांत धवड, अरुण डवरे, राजू नागुलवार, अलका दलाल, सुरेश जग्याशी आदींनी खड्ड्याच्या विषयावरून प्रशासनाला धारेवर धरले. प्रफुल्ल गुडधे यांनी हा विषय सभागृहात चर्चेसाठी आणला. कंत्राटदार वर्षानुवर्षे शहरातील रस्त्यांच्या डांबरीक रणाचे काम करीत आहेत. परंतु रस्त्यांचे काम करताना डांबर दिसत नाही. स्थायी समितीच्या माध्यमातून या कामांना मंजुरी दिली जाते. परंतु सदस्यांना तांत्रिक ज्ञान नसते. त्यामुळे रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याची जबाबदारी महापालिकेच्या अधिकाऱ्यांची असल्याचे विकास ठाकरे यांनी निदर्शनास आणले. कंत्राटदार रिंग बनवून रस्त्यांची कामे घेतात. कंत्राटदारांना अधिकाऱ्यांचे अभय नागपूर : कंत्राटदारांना अधिकाऱ्यांचाही आशीर्वाद असल्याचा आरोप करीत नाकेबंदी करून त्यांना काळ्या यादीत टाका. रस्त्यांच्या कामांची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना निलंबित करा, अशी मागणी त्यांनी केली.पहिल्याच पावसात शहरातील रस्त्यांवरील गिट्टी व डांबर उखडले आहे. कामाला वर्ष होण्यापूर्वीच शहरात रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. रस्त्यांच्या कामावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिकेची आहे. परंतु या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. दोषींची यादी लांबलचक आहे. अधिकाऱ्यांना निलंबित करून चालणार नाही. यावर प्रभावी उपायोजना करण्याची मागणी प्रफुल्ल गुडधे यांनी केली. बोगस गुणवत्ता प्रमाणपत्र देणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा १५ टक्केहून अधिक वा कमी दराच्या निविदा भरता येत नाही. परंतु अशा निविदा मंजूर केल्या जातात. अवैध रोड कटींग, केबल कंपन्यांनी केलेले खोदकाम यामुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात रस्ते नादुरुस्त होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. संजय बोंडे यांनी दोषी कंत्राटदारांना निलंबित करून महापालिकेत कोणतेही काम देऊ नये, अशी सूचना केली. किशोर गजभिये यांनी रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार करणाऱ्या कंत्राटदारांच्या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात यावे. तसेच बोगस गुणवत्ता प्रमाणपत्र देणाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. शहरातील पावसाळी नाल्या व सिवरेज यंत्रणा निर्माण केल्यास रस्ते नादुरुस्त होणार नाही, अशी सूचना अरुण डवरे यांनी केली. राजू नागुलवार यांनी डांबर कमी प्रमाणात वापरल्याने रस्ते खराब होत असल्याचे सांगितले. रस्त्यांमुळे नगरसेवक व महापालिकेची प्रतिमा मलीन होत असल्याचे किशोर डोरले म्हणाले. तर कंत्राटदारांना कमी दराने रस्त्यांची कामे देऊ नका, अशी सूचना प्रशांत धवड यांनी केली.(प्रतिनिधी)