शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

थुंकण्यासाठी रेल्वे प्रवाशांना पाऊचची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2020 8:38 PM

मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आता थुंकण्यासाठी एक पाऊच तयार केले आहे. प्रवासादरम्यान इतर कुठेही घाण न करता या पाऊचमध्येच थुंकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने आता थुंकण्यासाठी एक पाऊच तयार केले आहे. प्रवासादरम्यान इतर कुठेही घाण न करता या पाऊचमध्येच थुंकण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.विशेष म्हणजे प्रवासादरम्यान अनेकदा या पाऊचचा वापर करता येऊ शकतो. भारतीय रेल्वेत पहिल्यांदाच थुंकीसाठी पाऊचचा वापर करण्यात येणार असल्याने स्वच्छता राखण्यासाठी त्याची मदत होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे पाऊच वरदान ठरणार आहे.प्रवासादरम्यान प्रवाशांना तासन्तास एकाच बर्थवर बसून रहावे लागते. ज्येष्ठ नागरिक आणि आजारी असलेल्यांना थुंकीसाठी अडचण जाते. प्रवाशांच्या गर्दीतून पुन्हा पुन्हा उठून वॉशरुमपर्यंत जाणे शक्य होत नाही. थुंकी मागच्या खिडकीतील प्रवाशांच्या अंगावर पडते. त्यामुळे बरेचदा वादही होतात. शिवाय संक्रमणाचीही भीती असते. आता मात्र, खिडकीतून बाहेर थुंकण्याची गरज नाही. याकरिता प्रवाशांना केवळ १० रुपये खर्च करावे लागतील. हे पाऊच नागपूर रेल्वे स्थानकावरच मिळेल. या मशीनच्या लोकार्पणाला मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कृष्णाथ पाटील, सहायक वाणिज्य व्यवस्थापक विजय थूल, वाणिज्य निरीक्षक ताराप्रसाद आचार्य उपस्थित होते.प्लास्टिकने सामान गुंडाळा अन् निश्चिंत व्हानागपूर रेल्वे स्थानकावर कोरोनापासून बचाव करण्यासाठी निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे तर दुसरीकडे प्रवाशांचे सामान प्लास्टिकने गुंडाळण्याचीही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यासाठी नागपूर रेल्वे स्थानकावर एक केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्राचे उद्घाटन मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोमेशकुमार यांच्या मार्गदर्शनात भारवाहक संघटनेचे अध्यक्ष अब्दुल मजीद यांच्या हस्ते करण्यात आले. या केंद्रात प्रवाशांना आपले सामान प्लास्टिकने गुंडाळता येईल. १० ते १०० रुपयात ही सुविधा प्रवाशांना मिळेल. या पद्धतीमुळे प्रवाशांना दिलासा तर मिळेल शिवाय रेल्वेचा महसूल वाढणार आहे.

टॅग्स :railwayरेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या