नागपूर : महापारेषणच्या १३२ केवी क्षमतेचे बेसा सब स्टेशनमधील पॉवर ट्रान्सफार्मर बिघडल्याचा हवाला देत महावितरण कंपनीने असा दावा केला होता की, लोड व्यवस्थापनासाठी दक्षिण नागपुरातील नऊ फीडर परिसरा रात्र जास्तीत जास्त दोन तास लोडशेडींग केली जाईल. परंतु महावितरण मंगळवारी रात्री आपले आश्वासन पाळू शकले नाही. मुळाचत दोन ऐवजी चार तास लोडशेडींग झाली. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहे. दुसरीकडे गुरूवारी सायंकाळपर्यंत नवीन पॉवर ट्रान्सफार्मर स्थाित होईल आणि लोडशेडींगपासून मुक्ती मिळेल असा दावा महावितरणने केला आहे.
बेसा सब स्टेशनच्या २५ एमवीए क्षमतेच्या पॉवर ट्रांसफार्मरमध्ये रविवारी रात्री तांत्रिक बिघाड झाल्याने दक्षिण नागपुरातील अनेक भागात पुन्हा लोडशेडींग सुरू झाली आहे. पूर्ण लोड दुसऱ्या ट्रान्सफांर्मरवर आले आहे. या दरम्यान मंगळवारी रात्री १..३४ वाजता या ट्रान्सफांर्मरचीही शिटी फुटली आणि पूर्ण परिसर रात्री ३.४१ वाजेपर्यंत अंधारात बुडाले. इतकेच नव्हे तर रात्री विजेची मागणी सुद्धा ३२ मेगावॉटवरून ३६ मेगावॉट पर्यंत पोहोचली. त्यामुळे जानकी नगर, मानेवाडा १, विहीरगांर, हुडकेश्वर, जानकी नगर, दिघोरी आदी परिसरात दुप्पट वीज गुल राहिली. आता महावितरणचे म्हणणे आहे की, गुरूवारी सकाळपर्यंत नवीन पॉवर ट्रांसफार्मर स्थापित होईल. टेस्टींगनंतर सायंकाळी तो सुरू होण्याची शक्यता आहे.
मेंटनन्सचाही फटका
दक्षिण नागपुरातील बहुतांश भागात रात्री लो़डशेडींग होत आहे, तर शहरातील उर्वरित भागात मेंटननत्मुळे वीज पुरवठा खंडीत केला जात आहे. जयताळा, सोमलवाडा, धंतोली, त्रिमूर्तीनगर, महाल, वाठोडा, नंदनवन आदी भागात मेंटनन्समुळे वीज पुरवठा खंडीत केला जात आहे.