शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

राज्यातील वीज संकट तात्पुरते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:37 AM

महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण झाल्याची बाब ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्वत: स्वीकारली.

ठळक मुद्देऊर्जामंत्री बावनकुळे : १५ दिवसात परिस्थिती सुधारणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रात विजेचे संकट निर्माण झाल्याची बाब ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्वत: स्वीकारली. हे केवळ १५ दिवसाचे तात्पुरते वीज संकट असून नागरिकांनी आंदोलन न करता विजेची बचत करावी, असे आवाहनही केले. तसेच दिवाळीच्या पाच दिवसात भारनियमन होणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले.राज्यात निर्माण झालेल्या वीज संकटाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रविभवन येथे आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी यावेळी वीज कंपन्यांची पाठराखण करीत कोळशाच्या कमतरतेमुळे हे संकट ओढवल्याचे सांगितले. तसेच यासाठी पाऊस जबाबदार असल्याचे स्पष्ट केले. कोळशाच्या कमतरतेमुळे राज्यात दोन हजार मेगावॉट विजेची कमतरता निर्माण झाली आहे. मुंबई वगळता संपूर्ण राज्यात भारनियमन केले जात आहेत. महाजेनकोच्या औष्णिक वीज केंद्राची एकूण क्षमता ९९०० मेगावॉट इतकी आहे. परंतु सध्या ४९८० मेगावॉट वीज तयार होत आहे. त्याच प्रकारे अडाणी प्रकल्पातून ३ हजार मेगावॉटपैकी केवळ १७५० मेगावॉट वीज मिळत आहे. पॉवर एक्सचेंजमधून ७०० मेगावॉट वीज घेतल्यानंतरही विजेची कमतरता भरून निघत नाही. ओपन मार्केटमध्येसुद्धा वीज उपलब्ध नाही. त्यामुळे महाराष्ट्राला आणखी वीज उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी ही परिस्थिती समजून घेतली पाहिजे. विजेच्या बचतीने ही समस्या थोडी कमी होऊ शकते. नागरिकांनी आंदोलनाऐवजी वीज वाचवण्यावर अधिक भर द्यावा, दोन पंख्याऐवजी केवळ एकच पंखा वापरावा. एसीचा उपयोगही कमी करावा. स्ट्रीट लाईट, पाणीपुरवठा योजना व सरकारी कार्यालयात कमीत कमी विजेचा वापर करावा. पत्रपरिषदेला आ. मल्लिकार्जुन रेड्डी, महावितरणचे नागपूरचे मुख्य अभियंता शेख उपस्थित होते.पीयूष गोयल यांच्याशी चर्चाऊर्जामंत्र्यांनी सांगितले की, विजेच्या कमतरतेबाबत शनिवारी मुंबईत कोळसा मंत्री पीयूष गोयल यांच्याशी बैठक घेऊन चर्चा केली जाईल. मुख्यमंत्री फडणवीस हे सुद्धा कोळसा मंत्र्यांच्या संपर्कात आहेत. स्वत: त्यांनी वेकोलिशी चर्चा करून रॅक वाढवून घेण्यास यश मिळविले. पुलिंग योजनेंंतर्गत खासगी केंद्राला महाजेनकोचा कोळसा देण्याबाबत पुढाकार घेण्यात आला आहे. रस्ते मार्गाने कोळसा वाहतुकीवर भर दिला जात आहे. वीज केंद्रांपर्यंत पाईप कन्व्हेयर बेल्ट लावून खाणीमधून कोळसा थेट वीज केंद्रापर्यंत आणण्यास सुरुवात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.