दरम्यान, याबाबत शहर पाेलीस आयुक्त अमितेश कुमार यांना विचारले असता, नियमानुसार कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गंगा-जमुना वस्तीतील पाच इमारतींना अनधिकृत वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ च्या कलम १८ अंतर्गत सील करण्याचे आदेश दिले आहेत. नैसर्गिक न्यायाला धरून कायदेशीर प्रक्रिया पार पाडतच हे आदेश काढण्यात आले आहेत. सील करण्यापूर्वी विद्युत प्रवाह बंद करण्याची गरज लक्षात घेत महावितरणने या पाचही घरांची वीज कापल्याचे त्यांनी सांगितले. संपूर्ण गंगा-जमुना वस्तीची नाही तर कारवाई केवळ पाच घरांवर झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाचपैकी दाेन घरच्यांनी न्यायालयात कारवाईविरुद्ध आव्हान दिले हाेते; पण त्यांची याचिका न्यायालयाने खारीज केल्याचेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
साेशल मीडियावर अफवा
दरम्यान, गुरुवारी दिवसभर गंगा-जमुना वस्तीची वीज कापण्यात आल्याची बातमी साेशल मीडियावर व्हायरल झाली हाेती. बातमीसाठी पाेलिसांवर टीकाही केली जात आहे.