केंद्रीय मंत्री गडकरी यांची माहिती : ‘अॅग्रोव्हीजन’चे ४ ते ७ डिसेंबरला आयोजननागपूर : अॅग्रोव्हीजनच्या माध्यमातून विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती होईल. यातून शेती विकासाला चालना मिळेल. शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल होऊन आत्महत्या थांबण्याला मदत होईल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी पत्रपरिषदेत दिली.शेतकऱ्यांना शेती विषयक विविध प्रश्नावर मार्गदर्शन व्हावे,शेती क्षेत्रातील नवीन घडामोडींची विस्तृत माहिती देणारे मध्य भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन ‘अॅग्रोव्हीजन’ चे ४ ते ७ डिसेंबर २०१४ दरम्यान रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आले आहे. या संदर्भात गडकरी यांनी माहिती दिली.विदर्भातील कापूस, सोयाबीन व संत्रा पिकांची स्थिती वाईट आहे. या समस्यांवर उपाय शोधून ते लोकांपर्यत गेले पाहिजे. शेतीविषयक पूरक ज्ञान विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न अॅग्रोव्हीजनच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून सुरू आहे. हा राजकीय कार्यकम नाही. सर्वाचे सहकार्य व सहभागातून विदर्भाचा विकास करण्याचा निर्धार गडकरी यांनी यावेळी व्यक्त केला. वीज भारनियमन, कापूस व सोयाबीनची बिकट अवस्था यावर उपाय शोधण्याची गरज आहे. लिंबूवर्गीय फळावर संशोधन करण्यात आले आहे. यातून काटोल, नरखेड व वरुड यासारख्या संत्रा उत्पादक भागात संत्र्याचे उत्पादन वाढण्याला मदत होईल. तसेच पूर्व विदर्भात मोठ्या प्रमाणात मालगुजारी तलाव आहेत. यात मत्स्य व्यवसायाला चालना देण्याचा मानस गडकरी यांनी व्यक्त केला.अॅग्रोव्हीजनचे हे ६ वे वर्ष असून कृषी प्रदर्शनात देश -विदेशातील ३०० हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी होतील. बियाणे, खते, कीटनाशके, शेती औजारे, ट्रॅक्टर्स, सिंचन, ग्रीन हाऊ स,नेट शेड इत्यादी क्षेत्रातील नामांकित कंपन्या यात सहभागी होणार आहेत. नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली अॅग्रोव्हीजनचे उद्घाटन होणार असून मार्गदर्शक म्हणून केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह उपस्थित राहतील. यावेळी छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंग, वाणिज्य व उद्योग राज्यमंत्री निर्मला सीतारामन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आदी उपस्थित राहणार आहेत. अॅग्रोव्हीजनमध्ये ३० विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. यात दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, लागवड तंत्रज्ञान, संत्रा आदी विषयांचा समावेश आहे. तसेच समूह शेती, शेती उत्पन्नावर प्रक्रिया, पोषक तृणधान्य, औषधी वनस्पती, कापूस हाय डेन्सिटी, कडधान्य व तेलबिया उत्पादन, आधुनिक शेती, फळ प्रक्रि या, हरित गृह तंत्रज्ञान, कोल्ड चेन व्यवस्थापन, कृषी पर्यटन, सेंद्रीय शेती, डेअरी फामं, सिंचनाच्या आधुनिक पद्धती, रेशीम शेती, मत्स्यपालन, शेळी-मेंढी पालन आदी विषयावर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. दरवषीप्रमाणे यावेळीही अॅग्रोव्हीजनमध्ये एक दिवसीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेचे उद्घाटन केंद्रीय खाद्य प्रक्रिया मंत्री हरसिमरत कौर बादल करतील. पत्रपरिषदेला केंद्रीय मंत्री कालराज मिश्र उपस्थित राहणार आहेत. प्रारंभी रवी बोरटकर यांनी अॅग्रोव्हीजनची माहिती दिली तर संचालन रमेश मानकर यांनी केले.पत्रपरिषदेला अॅग्रोव्हीजन सल्लागार समितीचे अध्यक्ष डॉ. सी.डी.मायी, खासदार कृपाल तुमाने, रामदास तडस, अॅग्रोव्हीजनचे संयोजक गिरीश गांधी, माजी मंत्री रमेश बंग,अॅड. सुलेखा कुंभारे, माजी खासदार शिशुपाल पटले, आमदार अनिल सोले, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष देशमुख, डॉ. मिलिंद माने, सुधाकर कोहळे, जि.प.अध्यक्ष निशा सावरकर, माजी आमदार डॉ. खुशाल बोपचे,वेदचे देवेंद्र पारेख यांच्यासह सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. (प्रतिनिधी)चेक डॅमला केंद्राची मंजुरीसिंचन क्षमता वाढावी यासाठी ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांची कामे करताना नदी-नाल्यातील मातीचा वापर क रून चेक डॅम बांधण्यास केंद्र शासनाने मंजुरी दिल्याची माहिती नितीन गडकरी यांनी दिली.रेल्वे स्टेशनवर शेतकरी संत्रा विकतीलविदर्भाल संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लाभ व्हावा या हेतूने विदर्भातील रेल्वे स्टेशनवर संत्रा विकण्याला रेल्वे मंत्रालयाने अनुमती दिली आहे. पांढुर्णा ते चंद्रपूर व भंडारा ते अकोला दरम्यानच्या रेल्वे स्टेशनवर ही अनुमती देण्यात आली आहे.४० ते ५० हजारात सोलर पंपवीज भारनियमनाचा शेती उत्पादनावर परिणाम होत आहे. ही बाब विचारात घेता शेतीला पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना ५ लाखाचा सोलर पंप ४०ते ५०हजारात उपलब्ध केला जाणार असल्याची माहिती गडकरी यांनी दिली.
नवतंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना बळ
By admin | Published: November 10, 2014 1:06 AM