नागपूर : मागील वर्षी लाॅकडाऊन लागल्यावर महावितरणने खबरदारीच्या उपाययोजना म्हणून मीटर वाचन आणि वीज देयक वाटप बंद केले होते. मात्र या वेळच्या लॉकडाऊनमध्ये नागपूर महानगरपालिका क्षेत्रात मीटर वाचन आणि देयके वाटपाचे काम सुरू राहणार आहे.
नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने १५ ते २१ मार्च या काळात लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाकडे महावितरणने ही मागणी केली होती. वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. मीटर वाचन न झाल्याने मागील वेळी उडालेल्या गोंधळाचा अनुभव लक्षात घेता यासाठी परवानगी मागितली होती. ती मिळाल्याने या लॉकडाऊनमध्ये ग्राहकांच्या दारात जाऊन मीटर वाचन करणे आणि देयक वाटप करणे, ही सेवा दिली जाणार आहे.
...
वसुलीची आक्रमक मोहीम, साडेसात कोटींचा भरणा
थकबाकीदार वीज ग्राहकांच्या विरोधात महावितरणकडून मागील तीन दिवसात आक्रमक मोहीम राबविण्यात आली. यामुळे थकबाकी वसुली वाढत आहे. रविवारी सार्वत्रिक सुटी असूनही सुमारे चार हजार वीज ग्राहकांनी दीड कोटी रुपयांचा भरणा केल्याचे महावितरणने कळविले आहे. मागील दोन दिवसात २५ हजार ५३८ वीज ग्राहकांनी ७ कोटी १२ लाख रुपयांचा भरणा केला आहे.
...