लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुढीपाडव्यापासूनच शहरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील ४० हून अधिक संस्था शहरात निघणाऱ्या शोभायात्रेच्या कामात व्यस्त आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे हे ५२ वे वर्ष आहे.श्रीराम जन्मोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. रामसेवकांना त्यांच्या जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहे. सोबतच निघणारे चित्ररथही तयार झाले आहे. यासंदर्भात गुरुवारी श्रीराम जन्मोत्सव शोभायात्रा समितीने पत्रपरिषद घेतली. यात समितीचे वरिष्ठ सदस्य पुनित पोद्दार म्हणाले की, ५० हून अधिक चित्ररथ, ११ नृत्य पथक, १०८ मंगल कलशधारी महिला यात सहभागी होतील. गेल्यावर्षीप्रमाणेच यावर्षीही शंखनादाची परंपरा सुद्धा कायम आहे. ४०० युवक आत्माराम धुमारे यांच्या नेतृत्वात श्रीरामाच्या रथापुढे शंखनाद करणार आहे. पत्रपरिषदेला मंदिराचे ट्रस्टी रामकृष्ण पोद्दार, पं. उमेश शर्मा, सुरेश अग्रवाल, शांतिकुमार शर्मा, संतोष काबरा, भूषण गुप्ता, जयंत हरकरे आदी उपस्थित होते. २५ मार्च रोजी पहाटे ४ वाजता उत्थापन होईल. मंगल आरती, अभिषेक व अभ्यंगस्नान होईल. शहनाई वादनानंतर श्रीरामकृष्ण मठ कीर्तन मंडळ कीर्तनाचे सादरीकरण क रेल. दुपारी १२ वाजता रामजन्माचा सोहळा होईल.शोभायात्रेचा मार्ग बदलणार नाहीशोभायात्रा सायंकाळी ५ वाजता मंदिरातून निघेल. अतिथींच्याहस्ते श्रीरामाचे पूजन झाल्यानंतर शोभायात्रेला सुरुवात होईल. शहरात सिमेंट रस्ते व मेट्रोचे निर्माण कार्य सुरू असल्यामुळे मार्ग बदलविण्यात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. परंतु मार्गात कुठेही बदल करण्यात आलेले नाही. रस्त्यावरील बॅरीकेट काढून रस्त्याचे समतलीकरण करण्यात आले आहे. मंदिरातून शोभायात्रेला सुरुवात झाल्यानंतर शोभायात्रा काकडे चौक होत हंसापुरी, नालसाहब चौक, गांजाखेत, भंडारा रोड, शहीद चौक, चितार ओळ, पं. बच्छराज व्यास चौक, केळीबाग रोड, महाल, गांधीगेट, टिळक पुतळा, सुभाष मार्ग, आग्याराम देवी चौक, श्री गीता मंदिर, कॉटन मार्केट, डॉ. मुंजे चौक, सीताबर्डी मेन रोड, झाशी राणी चौक, मानस चौक, स्टेशन रोड होत संत्रा मार्केट येथे पोहचेल. शोभायात्रेची व्यवस्था ३०० संस्थेचे १८००० स्वयंसेवक सांभाळतील.
नागपूर शहरात रविवारी प्रभू श्रीरामाचा गजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:23 PM
गुढीपाडव्यापासूनच शहरात रामजन्मोत्सवाची तयारी सुरू झाली आहे. शहरातील ४० हून अधिक संस्था शहरात निघणाऱ्या शोभायात्रेच्या कामात व्यस्त आहे. श्री पोद्दारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचे हे ५२ वे वर्ष आहे.
ठळक मुद्देश्रीराम जन्मोत्सव: श्री पोद्दारेश्वर राम मंदिराच्या शोभायात्रेचे ५२ वे वर्ष