लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार यावर्षी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यपाल महाराजांनी संत महात्म्यांची विचारप्रणाली समाज प्रबोधनातून लोकांपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून पोहचविली. तसेच समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रुढी, परंपरा या गोष्टींचा नायनाट करण्यासाठी लोकजागृती केली. त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मारवाडी फाऊंडेशनतर्फे २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. या पुरस्काराने आतापर्यंत डॉ. भा.ल. भोळे, पन्नालाल सुराणा, डॉ. बाबा आढाव, डॉ. आ. ह. साळुंखे, प्रा. एन.डी. पाटील, रामकृष्णदादा बेलूरकर, शरद जोशी, डॉ. सदानंद मोरे, अॅड. मा.म. गडकरी, गिरीश कुबेर यांना गौरविण्यात आले आहे. हा पुरस्कार सोहळा प्रबोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त २० नोव्हेंबर रोजी संपन्न होईल.
प्रबोधनकार ठाकरे पुरस्कार सत्यपाल महाराजांना जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 1:40 AM
मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा प्रबोधनकार ठाकरे समाज-प्रबोधन पुरस्कार यावर्षी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांना जाहीर करण्यात आला आहे. सत्यपाल महाराजांनी संत महात्म्यांची विचारप्रणाली समाज प्रबोधनातून लोकांपर्यंत मनोरंजनाच्या माध्यमातून पोहचविली. तसेच समाजातील अंधश्रद्धा, जातीयवाद, जुन्या रुढी, परंपरा या गोष्टींचा नायनाट करण्यासाठी लोकजागृती केली. त्यांच्या कार्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मारवाडी फाऊंडेशनतर्फे २०१८ चा प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे.
ठळक मुद्देमारवाडी फाऊंडेशनचा पुरस्कार