शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

प्रणव मुखर्जी हे सर्व देशाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 10:35 PM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना का बोलविले यासंदर्भात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीच स्पष्टोक्ती केली. प्रणव मुखर्जी हे राजकीय पक्षात होते तेव्हा त्यांचे होते. मात्र ते ज्यावेळी राष्ट्रपती झाले तेव्हा ते संपूर्ण देशाचे झाले. आपल्या देशात आत्मियतेचा भाव असून त्यातूनच संघाने त्यांना निमंत्रित केले. असे करताना संघालादेखील संकोच वाटला नाही व निमंत्रण स्वीकारताना त्यांनादेखील संकोच वाटला नाही, या शब्दांत डॉ.भागवत यांनी संघाची भूमिका मांडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारीत ‘आधारवड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देमोहन भागवत : मुखर्जींना संघाने आत्मियतेच्या भावनेतून निमंत्रित केले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष वर्गाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना का बोलविले यासंदर्भात सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनीच स्पष्टोक्ती केली. प्रणव मुखर्जी हे राजकीय पक्षात होते तेव्हा त्यांचे होते. मात्र ते ज्यावेळी राष्ट्रपती झाले तेव्हा ते संपूर्ण देशाचे झाले. आपल्या देशात आत्मियतेचा भाव असून त्यातूनच संघाने त्यांना निमंत्रित केले. असे करताना संघालादेखील संकोच वाटला नाही व निमंत्रण स्वीकारताना त्यांनादेखील संकोच वाटला नाही, या शब्दांत डॉ.भागवत यांनी संघाची भूमिका मांडली. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे स्व. दत्ताजी डिडोळकर यांच्या जीवनावर आधारीत ‘आधारवड’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते.डॉ.वसंतराव देशपांडे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी, ‘अभाविप’चे राष्ट्रीय संघटनमंत्री सुनील आंबेकर, विदर्भ प्रदेशमंत्री विक्रमजित कलाने, प्रदेश अध्यक्ष डॉ.चंद्रकांत रागीट प्रामुख्याने उपस्थित होते. देशातील सर्व लोक एका सूत्राने बांधले गेले आहेत. विविध पक्ष, संघटना यात असताना त्यांना वेगळ्या भूमिकेत शिरावे लागते. मात्र सर्व जण एकच असून आत्मियतेचा भाव सर्वांना एकत्र करतो. आपल्या देशातील तरुणपिढीसमोर चांगली चरित्रे येणे आवश्यक आहे. केवळ महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्यात धन्यता मानू नये तर त्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न झाला पाहिजे, असे प्रतिपादन डॉ.भागवत यांनी केले. नितीन गडकरी यांनी दत्ताजी डिडोळकरांसोबत केलेल्या कामांच्या आठवणींना उजाळा दिला. डिडोळकर यांनी विद्यापीठाच्या राजकारणात असताना मौलिक मार्गदर्शन केले होते. ते अनेक कर्जदारांची ‘गॅरंटी’ घेत असत व त्यांच्याच प्रेरणेतून मीदेखील तसेच करत आहे. जबाबदारी, संंवेदनशीलता, देशकार्य हे केवळ भाषणाचे विषय नाही, तर तसे जगण्याची प्रेरणा डिडोळकरांनी दिली, असे गडकरी म्हणाले.सुनील आंबेकर यांनीही दत्ताजींच्या आठवणींना उजाळा दिला. चंद्रकांत रागीट यांनी प्रास्ताविक केले. मयुरी पंचबुद्धे हिने संचालन केले तर विक्रमजित कलाने यांनी आभार मानले.राष्ट्रीय अस्मितेचे प्रतिक उभारायला रोखू शकत नाहीयावेळी डॉ.भागवत यांनी दत्ताजी डिडोळकर यांनी कन्याकुमारी येथे केलेल्या मौलिक कार्यावर प्रकाश टाकला. स्वामी विवेकानंदांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या शिळेवर त्यांचे स्मारक उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले. मात्र काही धर्माच्या लोकांनी तेथील दगड उखडून फेकला. मात्र दत्ताजींनी प्रतिकूल परिस्थिती असतानादेखील केरळमधून तामिळनाडूत काही परिवारांना आणून वसविले व तेथील अतिक्रमण काढले. राष्ट्रीय अस्मितेची प्रतिके उभारण्यापासून कुणीच रोखू शकणार नाही, असे यावेळी डॉ.भागवत म्हणाले.तेव्हापासून ‘नाटके’ बंद केली‘अभाविप’मध्ये काम करताना अतिशय प्रतिकूल परिस्थिती होती. मात्र दत्ताजी नेहमी पाठीशी उभे राहत. आम्ही शहरात नाटके आयोजित करण्यास सुरुवात केली. मात्र ज्यादिवशी नाटकाचा शो होता, त्याच दिवशी इंदिरा गांधी यांना अटक झाली. त्यामुळे आता कलाकारांना पैसे कसे द्यायचे हा प्रश्न होता. दत्ताजींनी नाराजी व्यक्त केली, मात्र पैशांची मदत केली. मीदेखील हातातील सोन्याची अंगठी विकली व त्यानंतर थेट लग्नानंतरच अंगठी घातली. तेव्हापासून नाटके बंदच केली, असे गडकरी यांनी सांगितले.

टॅग्स :RSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघPranab Mukherjeeप्रणव मुखर्जी