शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

जि.प.त जाणवला पीआरसीचा तणाव

By admin | Published: September 30, 2015 6:51 AM

आठ वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीमुळे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या वातावरणात

नागपूर : आठ वर्षानंतर जिल्हा परिषदेच्या दौऱ्यावर आलेल्या पंचायत राज समितीमुळे संपूर्ण जिल्हा परिषदेच्या वातावरणात मंगळवारी तणाव जाणवला. अधिकाऱ्यांच्या कामाचे निरीक्षण होणार असल्याने अधिकाऱ्यांवर तणाव दिसून आला. पदाधिकाऱ्यांच्या कामकाजाची केवळ वर्षपूर्ती झाल्यामुळे त्यांचीही पळापळ होताना दिसली. गाऱ्हाणे मांडण्याची संधी न मिळाल्याने सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली. समिती पुढचे दोन दिवस जिल्ह्यात आहे. पहिल्या दिवसाचे कामकाज लक्षात घेता, पुढचे दोन दिवस अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसाठी डोईजड जाणार असल्याचे दिसते आहे. पंचायत राज समितीने सकाळी जिल्ह्यातील आमदारांची आणि जि.प. च्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान पदाधिकाऱ्यांनी काही सूचना समितीला केल्या. यात सदस्यांचा निधी वाढवून देण्यासंदर्भात मागणी करण्यात आली. अध्यक्षांचे अधिकार वाढवावे, कृषी विभागाच्या योजना जि.प. च्या माध्यमातून राबविण्यात याव्यात, अशा सूचना पदाधिकाऱ्यांनी समितीला केल्या. सभागृहात समितीचे कामकाज दिवसभर सुरू असल्याने, अध्यक्ष व सभापती सुद्धा पूर्णवेळ हजर होते. त्यांचीही सतत पळापळ होत होती. समितीत विविध पक्षाचे आमदार असल्याने, काही पदाधिकारी सेवेत व्यस्त होते. या सर्वात जि.प. सदस्यांची चांगलीच गोची झाली. समितीच्या दौऱ्यात सदस्याच्या भेटीचे नियोजन नसल्याने, सदस्यांना आपले गाऱ्हाणे मांडता आले नाही. त्यामुळे त्यांच्यात नाराजी होती. तरीही काही सदस्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन समितीपुढे आपले मत मांडले. विरोधी पक्षाच्या सदस्यांनी समितीला सभागृहातच गाठून तक्रारीचे निवेदन दिले. (प्रतिनिधी)जि.प. मधील गैरव्यवहाराची चौकशी करावी४कृषी विभागांतर्गत जि.प. सेस फंडातून क्रेट खरेदीसाठी निधी उपलब्ध होता. त्यात शेतकऱ्यांना ५० टक्के अनुदानावर क्रेट देण्याचे ठरविले होते. मात्र मर्जीचा ठेकेदार न मिळाल्याने कृषी अधिकाऱ्यांनी तीन वेळा निविदा काढल्या. क्रेट खरेदीसाठी अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसविले. ताडपत्री खरेदीतही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाला. शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळाले नाही, दुष्काळग्रस्त टंचाई आराखड्यातील निधी मंजूर होऊनही विंधन विहिरी झाल्या नाही. या तक्रारीचे निवेदन विरोधी पक्ष नेते मनोहर कुंभारे यांच्या नेतृत्वात उपासराव भुते, मनोज तितरमारे, शिव यादव, ज्ञानेश्वर कंभाले यांनी समितीला दिले. याप्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची निदर्शने४जि.प.च्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती वेतनापासून वंचित ठेवण्यात येत आहे. कर्मचाऱ्यांचे आठ ते दहा वर्षांपासून पेन्शन मंजुरी व भूगतान प्रलंबित आहे. नियमित पेन्शन मिळत नसल्याने जि.प. पेन्शनर महासंघाने जि.प.समोर नारेबाजी केली. त्यामुळे समितीचे अध्यक्ष संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी स्वत: त्यांची भेट घेतली. यावेळी महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गंगोत्री, एन. एल. सावरकर, के.जी. दाढे यांच्यासह मोठ्या संख्येने निवृत्त कर्मचारी उपस्थित होते.