शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

प्रेमानंद गज्वी ; खेड्यातला नाट्यरसिक ते नाट्य संमेलनाध्यक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 11:58 PM

चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.

ठळक मुद्देनिवडीने सर्वत्र आनंद : ‘किरवंत’काराचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपूरच्या पिंपळगाव या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या या मुलाला बालपणापासूनच नाटकांची प्रचंड आवड होती. कोणत्याही गावी होणारे नाटक पाहण्यासाठी कोस-दोन कोस पायी चालणारा हा मुलगा पुढे महाराष्ट्राच्या सर्वोच्च नाट्य सोहळ्याच्या अध्यक्ष पदावर निवडला जाईल, याची कल्पनाही कुणी केली नसेल. पण अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी निवड झालेल्या प्रेमानंद गज्वी यांचा हा थक्क करणारा प्रवास वैदर्भीय नाट्य व कलारसिकांना आनंद देणारा आहे.ज्येष्ठ नाटककार म्हणून महाराष्ट्रातील साहित्य विश्वात त्यांचे नाव आज आदराने घेतले जाते. गावातच प्राथमिक शिक्षण व पुढे नागपूरला महाविद्यालयीन शिक्षणाचा प्रवास केल्यानंतर मुंबईला त्यांनी नोकरी स्वीकारली. तसे लहानपणापासूनच कथा व कविता लेखनाचा प्रवास सुरू झाला होता. मात्र नोकरीत असताना स्पर्धेला नाटक पाठवायचे, या आग्रहाने ‘घोटभर पाणी’ या एकांकिकेचे लेखन केल्यानंतर हा नाट्यप्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला. शहरात राहूनही त्यांचे गाव कायम त्यांच्या मनात शिरलेलं. म्हणूनच ६०-६५ वर्षापूर्वीचं त्यांच गाव आधुनिक काळात पुरते बदलल्याची, कधी शुद्ध हवा देणाऱ्या गावातही प्रदुषण पसरल्याची खंत त्यांच्या मनात येते. या गावाचे प्रतिबिंब त्यांच्या नाटकातही झळकत राहिले.वेठबिगारांच्या जीवनातला संघर्ष मांडणाऱ्या‘तन माजोरी’ या नाटकाचा पहिलाच प्रयोग लंडनला झाला. त्याचे दिग्दर्शन ज्येष्ठ नाट्य व चित्रपट अभिनेता विक्रम गोखले यांनी केले. पुढे व्यवसायिक रंगभूमीवर झालेल्या प्रयोगात अभिनेता नाना पाटेकर यांनी अभिनय केला. स्मशानकर्मे पार पाडणाऱ्या ब्राम्हण वर्गाच्या जीवनाचा वेध घेणारे ‘किरवंत’ हे नाटक असेच लोकप्रिय ठरले. ज्येष्ठ अभिनेता डॉ. श्रीराम लागू यांनी व्यवसायिक रंगभूमीवर या नाटकाच्या प्रयोगाचे दिग्दर्शन व अभिनयही केला. त्यांच्या ‘देवनगरी, वांझमाती, जय जय रघुवीर समर्थ, पांढरा बुधवार, गांधी - आंबेडकर, रंगयात्री, शुद्ध बिजापोटी, अभिजात जंतू, दि बुद्धा, छावणी’ या नाटकांनाही अनेक पुरस्कार प्राप्त झाले. या नाटकांचे इंग्रजीसह इतर भाषांमध्ये अनुवादही झाले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्कारासह २५ पेक्षा जास्त पुरस्कार विविध साहित्यकृतीसाठी त्यांना प्राप्त झाले आहेत. लहानपणापासून जगलेले जीवन हीच आपली भूमिका असल्याचे सांगताना गेल्या ४५ वर्षापासून रंगभूमीची सेवा केल्यानंतर मिळालेला हा सन्मान आनंद देणारा आहे, अशी भावना त्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

 

टॅग्स :marathiमराठीliteratureसाहित्य