शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

प्रेमवीर फसले!

By admin | Published: February 01, 2016 2:38 AM

प्रेयसीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या दोन गुन्हेगार प्रेमवीरांना त्यांच्या प्रेयसीमुळेच पोलीस कोठडीची हवा खावी लागली.

नागपूर : प्रेयसीच्या विरहात अस्वस्थ झालेल्या दोन गुन्हेगार प्रेमवीरांना त्यांच्या प्रेयसीमुळेच पोलीस कोठडीची हवा खावी लागली. मोहम्मद ग्यासुद्दीन ऊर्फ लालटू मोहम्मद याकूब (वय ३७) असे लोहमार्ग (जीआरपी) पोलिसांच्या ताब्यात असलेल्या आरोपीचे नाव आहे. तब्बल २० दिवसांच्या प्रयत्नानंतर राऊरकेला येथे जाऊन जीआरपीने लालटूला जेरबंद केले तर, दुसऱ्याचे नाव कोमल मोहन सेन (वय २२, रा. भीमवाडी) आहे. त्याला यशोधरानगर पोलिसांनी छत्तीसगडमध्ये जाऊन ताब्यात घेतले. विशेष म्हणजे, कोमलने पोलिसांच्या कस्टडीत असताना स्वत:च्या गळ्यावर चिरे मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. हे करून स्वत:चा जीव धोक्यात घालतानाच कोमलने पोलिसांच्याही हृदयाची धडधड वाढविली. पत्नीच्या प्रेमात फरारी अडकला रेल्वेगाड्यात लाखो रुपयांची चोरी करून फरार झालेल्या आरोपीला आपल्या दुसऱ्या पत्नीच्या संपर्कात राहणे महागात पडले. २० दिवस जाळे पसरविल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी या आरोपीला अटक करण्यात यश मिळविले आहे.मोहम्मद ग्यासुद्दीन ऊर्फ लालटू मोहम्मद याकूब (३७) असे आरोपीचे नाव आहे. त्याला राऊरकेला येथून त्याच्या दुसऱ्या पत्नीच्या घरून अटक करण्यात आली. तिला भेटण्यासाठी तो हावडावरून आला होता. रविवारी लालटूला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १० दिवसांचा पीसीआर देण्यात आला. मूलतरु राऊरकेला येथील रहिवासी लालटूने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी छोटे किराणा दुकान उघडले होते. तेथे तो आपल्या पहिल्या पत्नीसोबत राहत होता. दुसरी पत्नी रेशमा राऊरकेलामध्ये राहते. फरार झाल्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी लालटूच्या संपूर्ण परिवाराचे मोबाईल क्रमांक ट्रेसिंगवर लावले होते. याच दरम्यान लोहमार्ग पोलिसांना लालटू आणि रेशमा यांनी मोबाईलवर संपर्क साधल्याची माहिती मिळाली. लालटू फरार झाल्यापासून अधिक सतर्क झाला होता. लोहमार्ग पोलीस उपनिरीक्षक चांभारे, दीपक डोर्लीकर, महेंद्र मानकर आणि अनिल मानकर यांच्या चमूने तीन दिवसापूर्वी लालटूच्या घरी छापा मारला. परंतु त्यांना हाती काहीच लागले नव्हते. परंतु थोड्याच वेळानंतर त्यांना तो राऊरकेला येथे येत असल्याचे समजले. ते त्याच्या घरी पोहोचले. परंतु त्याच्या घराला कुलूप दिसल्यामुळे ते आश्चर्यचकित झाले. परंतु तो राऊरकेला येथे येणार असल्याची माहिती पक्की असल्याची खात्री असल्यामुळे त्यांनी कुलूप तोडून दरवाजा उघडला असता लालटू आत बसलेला आढळला. १५ ते २० दिवसापूर्वी त्याला अटक केल्यानंतर तो रायगडजवळ रेल्वेगाडीचा वेग मंदावल्यावर पळून गेला होता. त्याने डेहराडून एक्स्प्रेसमधील प्रवासी आणि तामिळनाडू येथील रहिवासी सी. शेनबन चंद्रशेखर यांचे सोन्याचे दागिने लंपास केले होते.प्रेयसीच्या विरहात आत्महत्येचा प्रयत्न अल्पवयीन प्रेयसीला पळवून नेऊन तिच्याशी मंदिरात विवाह करणे एका तरुणाच्या चांगलेच अंगलट आले. पोलिसांनी त्याला अपहरणाच्या आरोपाखाली अटक केल्यामुळे त्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री घडलेल्या या घटनेने पोलिसांमध्ये खळबळ उडवून दिली. कोमल मोहन सेन (वय २२, रा. भिमवाडी, यशोधरानगर) असे जखमी आरोपीचे नाव आहे. तो कॅटरर्सकडे काम करतो. परिसरातील एका १६ वर्षीय मुलीशी त्याचे प्रेमसंबंध होते. ‘जिना मरना संग संग’ अशी शपथ घेतल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, कोमलने आपल्या अल्पवयीन प्रेयसीला घेऊन पळ काढला. ते छत्तीसगडमध्ये गेले आणि तेथे एका मंदिरात त्यांनी लग्न केले. दरम्यान, मुलगी बेपत्ता झाल्यामुळे पालकांनी कोमलवर संशय घेत यशोधरानगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. कोमलच्या मोबाईल ट्रॅकिंगवरून त्याला जेरबंद करण्यात आले. तो यशोधरानगर पोलिसांच्या कस्टडीत होता. शनिवारी रात्री ८ च्या सुमारास त्याने नैसर्गिक विधीला जातो असे सांगितल्याने हवलदार संजय मिश्राने त्याला शौचालयात सोडले. काही वेळेनंतर त्याच्या किंकाळ्या ऐकू आल्याने मिश्राने बघितले तेव्हा त्याने स्वत:च्या गळ्यावर ब्लेडने चिरे मारल्याचे दिसले. रक्तबंबाळ अवस्थेतील कोमलला यशोधरानगर पोलिसांनी लगेच मेयोत नेले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहे.