लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषिपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेमुळे वीजबिलांची थकबाकी असलेल्या शेतकºयांना दंड आणि व्याज बाजूला ठेवून मूळ थकबाकीचे पाच समान हप्त्यात थकबाकी भरता येईल, अशी माहिती राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी येथे पत्रपरिषदेत दिली.या योजनेत ३० हजारापेक्षा कमी थकबाकी असलेल्या ग्राहकांकडील थकबाकीच्या मूळ रकमेचे पाच समान हप्ते करण्यात आले तर ३० हजारापेक्षा अधिक असलेल्या ग्राहकांना मूळ थकबाकीचे १० समान हप्त्यात भरणा करावयाचा असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी चालू वीज बिल नोव्हेंबर २०१७ पर्यंत भरून, डिसेंबर २०१७ पासून मूळ थकबाकीपैकी २० टक्क्यांचा पहिला हप्ता थकबाकीदार शेतकºयांना भरावा लागेल. त्यानंतर मार्च २०१८ मध्ये २० टक्के, जून २०१८ मध्ये २० टक्के, सप्टेंबर २०१८ मध्ये२० टक्के व डिसेंबर २०१८ अखेरीस २० टक्क्यासह पूर्ण थकबाकी महावितरणकडे भरावयाची आहे. या योजनेत सहभागी न होणाºया थकबाकीदार शेतकºयांचा वीजपुरवठा खंडित केला जाईल, असेही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी सांगितले. शेतकºयांवर थकीत वीज बिलांचा अधिक भार पडणार नाही, हे लक्षात घेऊन शासनाने शेतकºयांकडील मूळ थकीत रकमेचे पाच समान हप्ते केले आहेत. या योजनेत सहभागी होणाºया शेतकºयांसाठी थकबाकीवरील दंड व व्याज माफ करण्याचे शासनाच्या विचाराधीन आहे.वीजनिर्मिती, पारेषण आणि वितरण यासाठी येणारा खर्च बघता, वीजबिल भरण्याबाबत शेतकºयांप्रति सकारात्मक विचार करण्याची शासनाची भूमिका आहे. थकबाकीदार शेतकºयांनी शासनाची ही भूमिका समजून घ्यावी व शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी केले आहे.महाराष्ट्रात एकूण अंदाजे ४१ लाख चालू स्थितीतील कृषी ग्राहक असून, त्यांचा एकूण विद्युत जोडभार २ कोटी १२ लाख एचपी एवढा आहे. सदर ४१ लाख चालू स्थितीतील ग्राहकांपैकी २५.४१ लाख ग्राहकांना मीटरद्वारे व १५.४१ लाख ग्राहकांची वीजजोडणी अश्वशक्तीवर आधारित देण्यात आली आहे. चालू स्थितीतील ग्राहकांपैकी ३७. ६५ लाख ग्राहक हे थकबाकीदार आहेत.चालू बिल भरल्यास कनेक्शन जोडून मिळेलगेल्या तीन वर्षात एकाही शेतकºयांची वीज कापलेली नाही. चालू महिन्याचे वीज बिल न भरल्यामुळे काही शेतकºयांचे वीज कनेक्शन कापण्यात आले. त्यांनी सुरू महिन्याचे बिल भरावे व योजनेत सामील व्हावे, त्यांचे कापलेले वीज कनेक्शन पुन्हा जोडून दिले जाईल, असेही ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.शेतकºयांना पाच वर्षांत सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्नशेतकºयांवर विजेचा भार पडू नये म्हणून त्यांना येत्या पाच वर्षात सौरऊर्जेवर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. यासाठी मुख्यमंत्री सौरकृषी योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये १ मेगावॅट, २ मेगावॅट ते २० मेगावॅटचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. १ मेगावॅटमध्ये २०० ते २५० शेतकरी, २ मेगावॅटमध्ये ५०० शेतकरी आणि २० मेगावॅटमध्ये साडेचार हजारावर शेतकरी जोडले जातील. त्यांना २ रुपये ९८ पैसे ते ३ रुपये १५ पैशापर्यंत प्रति युनिट वीज उपलब्ध होईल.
हप्त्याने भरा वीज थकबाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:26 AM
महाराष्ट्रातील वीज बिलांची थकबाकी असलेल्या कृषिपंपधारक शेतकºयांना दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र शासन ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना २०१७’ जाहीर करण्यात आली आहे.
ठळक मुद्देशेतकºयांसाठी ‘मुख्यमंत्री कृषिसंजीवनी योजना’ : ऊर्जामंत्री बावनकुळे यांची माहिती