शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
3
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
4
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
5
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
6
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
7
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
8
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
9
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
10
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
11
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
12
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
13
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
14
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
15
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
16
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
17
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
18
'डायरिया असताना पावसात शूट केलं रोमँटिक गाणं, वॉशरुमही...' मिनाक्षी शेषाद्रीने सांगितली आठवण
19
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
20
Maharashtra Election 2024 Live Updates: आमची सत्ता आल्यावर दिशा सालियान प्रकरणाची पुन्हा चौकशी लावणार: रामदास कदम

नागपूरच्या कळमना केंद्रात मतमोजणीची तयारी पूर्ण ,प्रशासन सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 9:37 PM

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता संपूर्ण लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे. येत्या गुरुवार २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूर व रामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कळमना येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे होणार आहे. त्याची संपूर्ण तयारी झाली असून, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे.

ठळक मुद्देप्रकियेत एक हजार कर्मचारी सहभागी : ९.३० वाजता येणार पहिल्या फेरीचा निकाल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या सातही टप्प्यातील मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे. आता संपूर्ण लक्ष निवडणूक निकालावर लागले आहे. येत्या गुरुवार २३ मे रोजी मतमोजणी होणार आहे. नागपूररामटेक या दोन्ही लोकसभा मतदार संघाची मतमोजणी कळमना येथील पंडित जवाहरलाल नेहरू मार्केट यार्ड येथे होणार आहे. त्याची संपूर्ण तयारी झाली असून, मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज आहे.

२३ मे रोजी सकाळी ८ मतमोजणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. दोन्ही मतदार संघाच्या मतमोजणीकरिता दोन स्वतंत्र शेड तयार करण्यात आले आहेत. या मतमोजणीच्या कामासाठी सुमारे एक हजार कर्मचारी लागणार असून, या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले आहे. मतमोजणीच्या दिवशी प्रथम सकाळी ८ वाजता बॅलेट पेपरची मोजणी होईल. यानंतर ईव्हीएममधील मतांच्या मोजणीला सुरुवात होईल. मतमोजणीसाठी एक लोकसभा मतदारसंघासाठी २० टेबल लावण्यात येणार आहे. त्यानुसार सरासरी १७ ते २० राऊंड (फेºयाा) होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाने एका फेरीची मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय दुसरी फेरी सुरू करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे पहिल्या फेरीचा निकाल जाहीर झाल्याशिवाय दुसºया फेरीला सुरुवात होणार नाही. मतमोजणीचा एक राऊंड पूर्ण होण्यासाठी साधारणत: ४५ ते ५० मिनिटांचा वेळ लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निकालासाठी १५ तासाहून अधिकचा वेळ लागण्याची चिन्हे आहेत. पहिल्या फेरीचा निकाल हा सकाळी ९.३० वाजताच्या दरम्यान येण्याची शक्यता आहे. 
व्हीव्हीपॅटची मोजणी सर्वात शेवटीईव्हीएमवरील मतमोजणी झाल्यानंतर व्हीव्हीपॅटमधील मतमोजणी होणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातील पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल. या पाच मतदान केंद्राची निवड एका बॉक्समध्ये चिठ्ठ्या टाकून करण्यात येईल. निवडणूक निर्णय अधिकारी पाच चिठ्ठ्या काढतील. ज्या मतदान केंद्राचे नाव आले, त्याच पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅटची मोजणी करण्यात येईल.या ईव्हीएममधील मतमोजणीही शेवटीमतमोजणी सुरू असताना कंट्रोल युनिटची बटन दाबूनही निकाल दाखवत नसेल तर अशा मशीन्समधील मतांची मोजणी सर्व मतमोजणी झाल्यानंतर करण्यात येईल. मतदान झाल्यानंतर क्लोजची बटन दाबली नसल्याने ही अडचण निर्माण होऊ शकते. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शन सूचनानुसार क्लोजची बटन दाबून या मशीनमधील मतमोजणी करता येते.अशा होणार फेऱ्यानागपूर लोकसभा :

विधानसभा      मतदान केंद्र        फेऱ्यादक्षिण-पश्चिम       ३७२                   १९दक्षिण                  ३४४                   १८पूर्व                       ३३४                   १७पश्चिम                   ३३१                    १७उत्तर                     ३५१                   १८मध्य                      ३०५                  १६रामटेक लोकसभाविधानसभा       मतदान केंद्र      फेऱ्याकाटोल               ३२८                   १७सावनेर               २६४                   १९हिंगणा                ४३३                   २२उमरेड                ३८३                   २०कामठी               ४८०                  २४रामटेक              ३५७                  १८सकाळी ६ वाजता उघडणार स्ट्राँग रुमकळमना येथील स्ट्राँग रुमला त्रिस्तरीय सुरक्षा कवच आहे. यामध्ये सीआरपीएफ, एसआरपीएफ आणि स्थानिक पोलीस, अशी तीनस्तरीय व्यवस्था आहे. याशिवाय परिसरात दीडशेवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. ही स्ट्राँग रुम आता गुरुवार २३ मे रोजी सकाळी ६ वाजता राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत उघडण्यात येईल. यानंतर ईव्हीएम मतमोजनीच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्तामध्ये पोहोचविण्यात येणार आहे.जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावालोकसभेच्या रामटेक व नागपूर मतदारसंघातील मतमोजणी २३ मे रोजी कळमना मार्केट यार्ड परिसरात करण्यात येणार असून, प्रत्यक्ष मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आलेल्या व्यवस्थेचा आढावा जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी घेतला.कळमना मार्केट परिसरातील दोन मोठ्या दालनामध्ये मतमोजणी करण्यात येणार आहे. विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून, रामटेक लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी होणार असून, यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे.पत्रकारांसाठी माध्यम केंद्र सुरु करण्यात आले असून, या केंद्रांमध्ये संगणक तसेच आवश्यक सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. मतमोजणीची सुरुवात पोस्टल बॅलेट पेपरने होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष इलेक्ट्रॉनिक्स मतदान यंत्रांच्या मतमोजणीला सुरुवात होईल. प्रत्येक फेरीनिहाय मतमोजणी होणार असून त्याप्रमाणे निकाल जाहीर करण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिली आहे.यावेळी रामटेक लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजलक्ष्मी शहा, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, जिल्हा नियोजन अधिकारी मिलिंद नारिंगे, उपजिल्हाधिकारी ररवींद्र कुंभारे, जिल्हा पुरवठा अधिकारी लीलाधर वार्डेकर, जिल्हा पुरवठा अधिकारी तायडे तसेच विविध विभागांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.अधिकृत पासधारकांनाच प्रवेश, मोबाईल नेण्यास निर्बंधमतमोजणीच्या परिसरालासुद्धा तीनस्तरीय विशेष सुरक्षा राहणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने अधिकृत पास असलेल्या व्यक्तींनाच या परिसरात प्रवेश देण्यात येणार आहे. मतमोजणी केंद्रांमध्ये कुणालाही मोबाईल नेण्यास निर्बंध असल्यामुळे सर्व मतमोजणीसंबंधी अधिकारी, कर्मचारी तसेच राजकीय पक्षांच्या नियुक्त केलेल्या प्रतिनिधींनी या परिसरात येताना मोबाईल सोबत आणू नयेत, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन मुदगल यांनी केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालnagpur-pcनागपूरramtek-pcरामटेक