शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू दोन दिवस नागपुरात, नागपूर विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभातही सहभागी होणार

By जितेंद्र ढवळे | Published: November 30, 2023 4:49 PM

मेडिकलच्या अमृत महोत्सवाचे उद्घाटन करणार

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) अमृत महोत्सवाचे उद्घाटन आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या १११ व्या दीक्षांत समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू १ व २ डिसेंबर रोजी नागपुरात येत आहेत.

शुक्रवार, दि.१ डिसेंबर रोजी राष्ट्रपतींचे पुणे येथून सकाळी १२:१० वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने आगमन होईल. विमानतळावर स्वागत स्वीकार करून दुपारी १२:२० वाजता त्या राजभवन येथे जातील. यानंतर दुपारी ३:१० वाजता राष्ट्रपती नागपुरातील कुकडे ले-आउट येथील श्री जगन्नाथ मंदिराला भेट देतील. याठिकाणी दर्शन व आरतीत सहभागी होतील. यानंतर दुपारी ४:०० वाजता मेडिकलच्या परिसरात आयोजित अमृत महोत्सवी कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. या कार्यक्रमानंतर राजभवनकडे प्रयाण व मुक्काम करतील.शनिवार दि. २ डिसेंबर रोजी राष्ट्रपती सकाळी १०:१० वाजता राजभवन येथून कविवर्य सुरेश भट सभागृहाकडे रवाना होतील. येथे सकाळी १०:३० ते ११:३० वाजेपर्यंत आयोजित राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या १११ व्या दीक्षांत समारंभात सहभागी होतील. यानंतर सकाळी ११:४५ वाजता विमानतळाकडे प्रयाण करतील. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाहून भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाने सकाळी ११:४५ वाजता राष्ट्रपतींचे दिल्लीकडे प्रयाण होईल.

राज्यपाल रमेश बैसही येणारराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या दोन्ही कार्यक्रमांत राज्यपाल रमेश बैस हेही सहभागी होतील. शुक्रवार, १ डिसेंबर रोजी राज्यपालांचे पुणे येथून सकाळी १२:१० वाजता नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर येथे आगमन होणार आहे. विमानतळावरील राष्ट्रपतींच्या स्वागतानंतर दुपारी १२:२० राजभवनकडे राज्यपालांचे प्रयाण होईल. यानंतर दोन्ही दिवस ते राष्ट्रपतींच्या उपस्थित होणाऱ्या कार्यक्रमात सहभागी होतील. राज्यपालांचे दि. २ डिसेंबर रोजी सायंकाळी ५:०० वाजता नागपूर विमानतळाहून मुंबईकडे प्रयाण होईल.

टॅग्स :Draupadi Murmuद्रौपदी मुर्मू