लोकमत न्यूज नेटवर्कहिंगणा : ‘नोटाबंदी’च्या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘नोटाबंदी’सह केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसने बुधवारी ‘काळा दिवस’ पाळला. यानिमित्त हिंगण्यात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. सोबतच शासनाची प्रतिकात्मक प्रेतयात्राही काढली. यावेळी शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी मंत्री रमेश बंग यांच्या नेतृत्वात तहसीलदार प्रताप वाघमारे यांच्याकडे निवेदन सोपविण्यात आले. या आंदोलनात दोन हजारांहून अधिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते.नोटाबंदीला एक वर्ष झाले. मात्र नोटाबंदी ही पूर्णत: फसली. विकासदर खाली आला, याविरोधात राष्टÑवादीने केंद्र शासनाच्या धोरणाचा विरोध करीत ‘काळा दिवस’ पाळला. यावेळी रमेश बंग म्हणाले, नोटाबंदीने रोजगारावर कुºहाड कोसळली. विकासदर कमी झाला. नोटाबंदीच्या काळात बँक आणि एटीएमच्या रांगेत उभे राहून अनेकांचा मृत्यू झाला. शासनाने शेतकºयांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा केली. मात्र त्यासाठी एकूण ७ जीआर व आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी ६४ कलम लावले. ही कर्जमाफी फसवी आहे. हिंगणा तालुक्यात तीन हजार शेतकºयांनी कर्जमाफीचे अर्ज सादर केले. त्यातील केवळ ७३ शेतकºयांना वैध ठरविण्यात आले. त्यामुळे ही कर्जमाफी शेतकºयांसाठी नाहीच, हे सिद्ध होते. भाजप शासनाच्या काळात गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तंूचे भाव वाढले, शेतकºयांच्या मालाला भाव नाही, विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळत नाही यासह विविध समस्या आहेत. शेतकºयांच्या हिताचा स्वामिनाथन आयोग लागू करावा, शेतकºयांकडील कृषिपंपाचे वीज कनेक्शन बंद करू नये, विद्युत दर कमी करावे आदी मागण्या यावेळी त्यांनी केल्या. सदर मागण्यांचे निवेदन तहसीलदारांकडे सोपविले.आंदोलनात राष्टÑवादीच्या महिला जिल्हाध्यक्ष उज्ज्वला बोढारे, तालुकाध्यक्ष प्रवीण खाडे, वीरश्री चानपूरकर, जितेंद्र बोटरे, सुमित वानखेडे, पंचायत समिती सभापती रेखा कळसकर, पुरुषोत्तम गावंडे, रामराव येळणे, प्रमोद बंग, नरेंद्र चतूर, निर्मला भलावी, हनुमान दुधबडे, मीनाक्षी ढोले, छाया भोसकर, शर्मिला उपाध्याय, कल्पना उइके, शीलानंद बागडे, मंगेश भांगे, नरेश नरड, मनोज जीवने, अभय डबुरकर, मुख्तार शेख, सतीश कोल्हे, संजय नवघरे, अरुण देवतळे, विजय नंदनवार, शेषराव उइके, राजू कोरडे, नंदा कोरडे, युवराज पुंड, रमेश ठाकूर, पुरुषोत्तम गोतमारे, अनिल क्षीरसागर, अनसूया सोनवाणे, लीला चामाटे, बेबी चिव्हाणे, भावना पुंड, मीना मेश्राम, लिलाधर दाभे, सुधाकर धामंदे, युसुफ पठाण, शीतल चामाटे आदी सहभागी झाले होते.
हिंगण्यात राष्टÑवादीचा रास्तारोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 09, 2017 1:18 AM
‘नोटाबंदी’च्या घोषणेला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त ‘नोटाबंदी’सह केंद्र व राज्य शासनाच्या धोरणाचा विरोध दर्शविण्यासाठी राष्टÑवादी काँग्रेसने बुधवारी ‘काळा दिवस’ पाळला.
ठळक मुद्दे‘नोटाबंदी’चा काळा दिवस : प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढली