शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

राष्ट्रपतींनी विकास मंडळांची मुदत वाढविण्यासाठी हायकोर्टात अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2021 10:29 AM

Nagpur News विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेशाकरिता विकास मंडळे स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींनी राज्यपालांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या आदेशाची मुदत वाढवली जावी याकरिता नितीन रोंघे आणि विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे.

ठळक मुद्देजनहित याचिकेत दुरुस्ती१२ जुलै रोजी होईल सुनावणी

 लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विदर्भ, मराठवाडा व उर्वरित महाराष्ट्र प्रदेशाकरिता विकास मंडळे स्थापन करण्यासाठी राष्ट्रपतींनी राज्यपालांना दिलेल्या विशेषाधिकाराच्या आदेशाची मुदत वाढवली जावी याकरिता स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थक नितीन रोंघे आणि विदर्भ विकास मंडळाचे माजी तज्ज्ञ सदस्य डॉ. कपिल चंद्रायण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात अर्ज दाखल केला आहे. या अर्जावर १२ जुलै रोजी न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी होणार आहे.

या अर्जदारांनी विदर्भ विकास मंडळाला मुदतवाढ मिळावी याकरिता जनहित याचिका दाखल केली आहे. त्यात राष्ट्रपतींच्या आदेशाची मुदत वाढविण्यासंदर्भात प्रार्थना करण्यात आली नव्हती. त्यामुळे हा अर्ज दाखल करून याचिकेत दुरुस्ती करण्याची परवानगी मागण्यात आली आहे. केंद्र सरकारने राष्ट्रपतींना विकास मंडळांविषयीच्या आदेशाची मुदत वाढवण्याची विनंती करावी, यासाठी आवश्यक निर्देश देण्यात यावे, अशी प्रार्थना दुरुस्तीनंतर याचिकेमध्ये समाविष्ट केली जाणार आहे.

राष्ट्रपतींनी आर्टिकल ३७१(२) अनुसार विकास मंडळे स्थापन करण्यासाठी राज्यपालांना सर्वप्रथम १९९४ मध्ये विशेषाधिकार दिला होता. त्यासंदर्भात राष्ट्रपतींनी ९ मार्च १९९४ मध्ये आदेश जारी केला होता. त्या आदेशाची मुदत पाच वर्षे होती. त्यानंतर या आदेशाची मुदत नियमित वाढविण्यात आली. याविषयी शेवटची अधिसूचना ३० एप्रिल २०१५ रोजी जारी करून आदेशाची मुदत ३० एप्रिल २०२० पर्यंत वाढविण्यात आली होती. त्यापुढे मुदत वाढविण्यात आली नाही. त्यामुळे आदेशाचा प्रभाव १ मे २०२० पासून संपुष्टात आला. परिणामी, विदर्भ विकास मंडळाचे अस्तित्वही संपुष्टात आले. विदर्भाच्या प्रगतीसाठी विकास मंडळाचे अस्तित्व टिकवणे आवश्यक आहे. करिता, पूर्वीप्रमाणे यापुढेही राष्ट्रपतींच्या आदेशाची मुदत नियमित वाढविण्यात यावी असे अर्जदारांचे म्हणणे आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय