शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना २१०० रुपये, २५ लाख नवीन नोकऱ्या...; भाजपच्या संकल्प पत्रात काय-काय?
2
"मग मी पण बघतो तुम्ही आमदार कसे काय राहता", अजित पवारांचं रामराजेंना आव्हान
3
परशुराम घाटात पुन्हा भीषण अपघात, एसटी चालकासह एक प्रवासी जखमी, वाहतूक ठप्प
4
धक्कादायक! २५ मुलींना जाळ्यात अडकवलं, लाखो रुपये उकळले; बनावट IRS चा झाला पर्दाफाश
5
"राहुल गांधींनी आपल्या वडिलांना आणले, तरी...", प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांची जीभ घसरली
6
"बापाचा विषयच नाही इथे, तुमचे काकाच..."; जयंत पाटलांचा अजित पवारांवर 'वार'
7
"अरे माझ्या सभेत गुंड प्रवृत्तीचे लोक पाठवून धिंगाणा काय करता? ताईंनो..."; आमदार बंब विरोधकांवर जाम भडकले
8
पान मसालाच्या जाहिरातीवरुन होणाऱ्या ट्रोलिंगवर अजय देवगणची प्रतिक्रिया, म्हणाला...
9
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना अनुकूल, धनलाभ; उत्तम यश-प्रगती, विठ्ठल-रखुमाई शुभच करतील!
10
ग्रेटर नोएडा एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
11
महिलांची व्यवस्था करतो ही कसली भाषा? धनंजय महाडिकांना प्रणिती शिंदेंचा संतप्त सवाल 
12
"...तर राजीनामा देऊन त्यांचा कार्यकर्ता होईन"; आमदार प्रशांत बंब यांचं चॅलेंज सतीश चव्हाण स्वीकारणार?
13
कोलकाता डॉक्टर हत्या प्रकरण: ज्युनियर डॉक्टरांचं आंदोलन; ममता सरकारवर गंभीर आरोप
14
वयाच्या ८० व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेते गणेश यांचं निधन, ४०० हून अधिक सिनेमांमध्ये केलेलं काम
15
'सिंघम अगेन'मधील सलमान खानच्या कॅमिओवर रोहित शेट्टी म्हणाला, "त्याच्या सुरक्षेमुळे..."
16
भाजपा आमदाराच्या भावाची घरात घुसून बेदम मारहाण करून हत्या; नातीच्या अपहरणाचा प्रयत्न
17
'आंबेडकर जिंदा हैं तो गोडसे मुर्दा है'; पंतप्रधान मोदींच्या 'एक हैं तो सेफ हैं'वर काय म्हणाले ओवेसी?
18
राम चरणचा 'लय भारी' अंदाज अन् जोडीला कियारा अडवाणी! 'गेम चेंजर'चा हटके टीझर रिलीज
19
"पराभूत झाल्या तर मुलांचा सांभाळ करतील, याचा फायदा...", भाजप नेत्याचे RLP खासदाराच्या पत्नीबाबत विधान
20
"खोटं बोल पण रेटून बोल ही महाडिकांची स्टाईल", लाडकी बहीण योजनेच्या वक्तव्यावरुन सतेज पाटलांचा हल्लाबोल

इचमपल्ली धरणासाठी राज्यपालांवर दबाव!

By admin | Published: November 12, 2014 12:57 AM

तेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना

तेलंगण भाजपा महाराष्ट्राच्या मुळावरअभिनय खोपडे - गडचिरोलीतेलंगण सरकारने इचमपल्ली धरणाच्या निर्मितीसाठी आक्रमक पाऊल उचलले असून, रविवारी हैदराबाद येथे आयोजित महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांच्या सत्कार कार्यक्रमात त्यांना इचमपल्ली धरणाच्या कामासाठी महाराष्ट्र सरकारचे प्रतिनिधी म्हणून सहकार्य करा, असे जाहीर आवाहनच करण्यात आले. तसेच महाराष्ट्राच्या राज्यपालांवर तेलंगण सरकारने या कामासाठी मोठा दबाव वाढविला असल्याची विश्वसनीय माहिती आहे. महाराष्ट्र-तेलंगण सीमेलगत १९८० च्या दशकात इचमपल्ली धरणाचे काम करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, त्यावेळी ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी या प्रकल्पाला विरोध केला होता़ या धरणात सिरोंचा तालुक्यातील दीडशे गावे बुडीत क्षेत्रात जाणार आहेत. तत्कालीन वनमंत्री छेदीलाल गुप्ता यांनी सदर धरण झाल्यास आपण पहिले आंदोलन करू, असाही इशारा आंध्र प्रदेश सरकारला दिला होता. महाराष्ट्राचा हा विरोध लक्षात घेऊन या धरणाचे काम ३० वर्षांपासून प्रलंबित आहे. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हस्तक्षेप करून हे काम थांबविले होते. इचमपल्ली धरणामुळे तेलंगणच्या १० जिल्ह्यांतील जवळपास दीड लाख एकर जमीन ओलीताखाली येणार आहे. तसेच छत्तीसगडमध्ये वीज निर्मिती प्रकल्पालाही पाणी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तेलंगण या धरणाचे काम मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. तेलंगण सरकारतर्फे हैदराबाद येथे महाराष्ट्राचे राज्यपाल चेन्नमेनेनी विद्यासागर राव यांचा ९ नोव्हेंबर रोजी जाहीर नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी राव यांना इचमपल्ली धरणाचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी सहकार्य करण्याचे जाहीर आवाहन केले. राज्यपाल राव हे तेलंगणच्या करिमनगर भागातील रहिवासी आहेत. ते भाजपाचे माजी खासदारही होते. ते इचमपल्ली धरणाचे समर्थक असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांनी सत्कारादरम्यान धरणाच्या कामासाठी सर्व सहकार्य केले जाईल, असे आश्वासन दिल्याची विश्वसनीय माहिती आहे. मोदी सरकारच्या मंत्रिमंडळात रविवारी बंडारू दत्तात्रेय यांचीही वर्णी लागली आहे. तेही या इचमपल्ली धरणाचे कट्टर समर्थक आहेत. याशिवाय तेलंगण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष क्रिष्णा रेड्डी यांनी २००३-०४ मध्ये सदर धरणाचे काम मार्गी लागावे म्हणून आंदोलन केले होते. त्यावेळी ते भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. तेलंगणमधील भाजपाची भूमिका ही इचमपल्ली धरणाच्या समर्थनाची आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रावर केंद्र सरकार व राज्यपाल राव यांच्या माध्यमातून दबाव वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे़ दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सद्यस्थितीत सुरू असलेल्या चव्हेला धरणाच्या कामालाही विरोध केलेला नाही. आता पुन्हा एका धरणाचे नवे संकट महाराष्ट्रावर येऊ घातले आहे.दरम्यान, चंद्रपूर-गडचिरोली क्षेत्राचे माजी खासदार नरेश पुगलिया यांचेशी संपर्क साधला असता ते म्हणाले, १९८० मध्ये आपण आमदार असताना या धरणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या धरणामुळे सिरोंचा तालुक्याला मोठा फटका बसणार आहे. सुमारे दीडशेवर गाव बुडीत क्षेत्रात जातील. वनजमीनही बुडणार आहे. त्यामुळे या धरणाला विरोध करण्यात आला होता.