हायकोर्टाने व्यक्त केली भीती कचऱ्याची विल्हेवाट लावणे आवश्यक मनपाला कधी येईल जाग ? लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्यात चालढकल केल्यास शहरावर डेंग्यूचा हल्ला होण्यास वेळ लागणार नाही, अशी भीती मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी संबंधित प्रकरणावरील सुनावणीदरम्यान व्यक्त केली. तसेच, कचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याच्या प्रकल्पाचे काय झाले, अशी विचारणा मनपाला करून यावर दोन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेत. शहरातील अस्वच्छतेसंदर्भात पुनम प्राईड कन्डोमिनिअमचे अध्यक्ष एस. सी. बेरा व व्यावसायिक अनिल आग्रे यांनी वेगवेगळ्या जनहित याचिका दाखल केल्या आहेत. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय भूषण धर्माधिकारी व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, शहरातील विविध भागांतील कचऱ्याची छायाचित्रे न्यायालयाला दाखविण्यात आली. तसेच, कनक रिसोर्सेस मॅनेजमेंट कंपनी कचऱ्याची पूर्णपणे उचल करीत नसून त्यांच्यावर मनपाचे कुठलेच नियंत्रण नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. न्यायालयाने ही बाब गंभीरतेने घेऊन शहरातील अस्वच्छतेवर चिंता व्यक्त केली. मनपाला फटकारून यावर स्पष्टीकरण मागितले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. देवेंद्र चव्हाण तर, मनपातर्फे अॅड. सुधीर पुराणिक यांनी बाजू मांडली.
-तर उपराजधानीत डेंग्यूचा प्रकोप
By admin | Published: July 06, 2017 2:25 AM