नागपूर : आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे सोने आणि चांदीच्या दरात गुरुवारी वाढ झाली. सोने ५०० रुपयांनी वाढून ७२,१०० रुपये आणि चांदीत १,२०० रुपयांची वाढ होऊन भाव ८८,३०० रुपयांवर पोहोचले.
सोने-चांदी या दोन्ही मौल्यवान धातूंच्या भावात बुधवारच्या तुलनेत गुरुवारी तीनदा चढउतार दिसून आली. सकाळच्या सत्रात सोने आणि चांदीचे भाव २०० रुपयांनी कमी होऊन भावपातळी अनुक्रमे ७१,४०० आणि ८६,९०० रुपयांवर गेली.
सायंकाळी ७ च्या सुमारास सोन्यात सकाळच्या तुलनेत ५०० रुपये आणि चांदी १,२०० रुपयांची वाढ झाली. सायंकाळी ७.३० च्या सुमारास सोने-चांदीचे भाव २०० रुपयांनी वाढले आणि बुधवारच्या तुलनेत गुरुवारी अनुक्रमे ७२,१०० आणि ८८,३०० रुपयांवर स्थिरावले. शुक्रवारी भाव आणखी वाढण्याची शक्यता नागपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.