लाेकमत न्यूज नेटवर्क
मांढळ : मांढळ (ता. कुही) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात साेयाबीन खरेदीचा गुरुवारी (दि. २३) प्रारंभ करण्यात आला. पहिल्या दिवशी केवळ ५० क्विंटल साेयाबीनची आवक झाली. पहिल्या दिवशी साेयाबीनला प्रतिक्विंटल ४,५०० ते ४,९०० रुपये भाव मिळाला.
मांढळ बाजार समितीत बाजार समितीचे सभापती मनाेज तितरमारे यांच्या हस्ते काटापूजन केल्यानंतर दलालांमार्फत साेयाबीनची बाेली बाेलायला सुरुवात झाली. साेयाबीनला प्रतिक्विंटल ४,५०० ते ४,९०० रुपये भाव मिळाला, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. पहिल्या दिवशी साेयाबीन विकायला आणणाऱ्या कवळू कारमोरे (रा. मांढळ), विष्णू भोतमांगे, रूपेश हारगुडे व सेलोकर (तिघेही रा. माजरी) या शेतकऱ्यांचा बाजार समितीच्यावतीने गाैरव करण्यात आला.
याप्रसंगी बाजार समितीचे उपसभापती महादेव जीभकाटे, हरीश कडव, बबन गायधने, गुणाकार सेलोकर, अशोक रामटेके, उदाराम फेंडर, प्रमोद मुटकुरे, नामदेव बुराडे, खेमेश्वर तितरमारे, किशोर कुर्जेकार, संजय भोतमांगे, राजेंद्र बागडे, बंडू भोयर, शुभम नखाते, अशोक तिरपुडे, संकी अरोरा, सुधाकर खानकुरे, संतोष चोपकर, मधू चाचेरकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.