लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राखी जीएसटी मुक्त झाल्याने खरेदीचा उत्साह वाढला आहे. कच्च्या मालाची किंमत वाढल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव १५ ते २० टक्क्यांनी वाढले आहे. नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ असल्यामुळे या व्यवसायात दरवर्षी कोट्यवधींची उलाढाल होत असल्याची माहिती ठोक विक्रेत्यांनी लोकमतशी बोलताना दिली.बहिणीच्या रक्षणाची जबाबदारी स्वीकारणाऱ्या प्रत्येक भावासाठी महत्त्वाचा असलेला सण म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये अन्य सणांइतकेच या पारंपरिक सणाला महत्त्व आहे. काळानुसार या सणाचा ट्रेंड बदलला असला तरी लहान मुलामुलींपासून वृद्ध भावाबहिणींमध्येही रक्षाबंधनाचा उत्साह कायम असतो. यावर्षी रविवार, २६ आॅगस्टला रक्षाबंधन सण साजरा करण्यात येणार आहे. यंदा रजवाडी, स्टोन आणि कुंदन राख्यांना चांगली मागणी आहे. फॅन्सी, स्टायलिश राख्यांची सर्वाधिक विक्री होत आहे. आतापर्यंत ठोक बाजारात ८० टक्के स्टॉक विकण्यात आला आहे. युवती आणि महिलांची आकर्षक व अनोखे रंग, डिझाईन आणि पॅटर्नला जास्त पसंती आहे. शुक्रवारी महिलांनी इतवारी मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी चांगलीच गर्दी केली होती. राख्यांसोबत ग्रिटिंग कार्डला चांगली मागणी आहे. खरेदी करताना किमतीऐवजी रंगसंगतीला जास्त पसंती असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.२ ते ५०० रुपयांची राखीबाजारपेठेत धाग्यापासून तयार केलेल्या राखीची किंमत दोन रुपयांपासून आहे. याशिवाय अनोख्या राख्या ५०० रुपयांपर्यंत आणि सराफांच्या दुकानात चांदीच्या राख्या पाच हजार रुपयांपर्यंत विक्रीस आहेस. दिवसेंदिवस राख्यांचा बाजार वाढत आहे. तुळशीचे मणी, रुद्राक्षांचा वापर केलेल्या राख्या बाजारात विक्रीस आहेत. लहान मुलांची कार्टुन राख्यांना पसंती आहे. इतवारीतील विक्रेत्याने सांगितले की, नागपुरातील व्यापारी मुंबई, अहमदाबाद, कोलकाता येथून कोट्यवधींच्या राख्या मागवितात. यंदा भाववाढीनंतरही व्यवसायात उत्साह आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा दुपटीने व्यवसाय होण्याचे संकेत आहेत. मध्यंतरी आलेल्या पावसामुळे लोकांमध्ये या सणाविषयी उत्साह दिसून येत आहे.हॅण्डमेड राख्यांना पसंतीनागपुरात हॅण्डमेड राख्यांची निर्मिती गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात होत आहे. या राख्यांना सर्वस्तरातून मागणी दिसून येत आहे. गृहउद्योग करणाऱ्या