मनपा शाळांचा निकाल ९९.९३ टक्के : इंग्रजी माध्यमाची सानिया परीन मो. इम्तियाज चारही माध्यमातून प्रथम
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इयत्ता दहावीचा निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. मनपाच्या शाळांचा निकाल ९९.९३ टक्के आहे. सोमवारी मनपा मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात प्राविण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
जी. एम. बनातवाला इंग्रजी माध्यमिक शाळेची विद्यार्थिनी सानिया परीन मो. इम्तियाज सर्वाधिक ९५.८० टक्के गुणांसह मराठी, हिंदी, उर्दू आणि इंग्रजी या चारही माध्यमांमधून प्रथम आली आहे. यावेळी उपमहापौर मनीषा धावडे, स्थायी समिती सभापती प्रकाश भोयर, सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, शिक्षण समिती सभापती प्रा. दिलीप दिवे, अतिरिक्त आयुक्त दीपककुमार मीणा, शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर, सहाय्यक शिक्षणाधिकारी राजेंद्र सुके, समिती सदस्य व नगरसेवक उपस्थित होते.
वर्षभर केलेल्या परिश्रामाचे फलित व त्याची परिश्रुती म्हणून या निकालाकडे बघावे, असा संदेश दयाशंकर तिवारी यांनी विद्यार्थ्यांना दिला. दिलीप दिवे यांनी निकालाची माहिती दिली. यावर्षी मनपाच्या २९पैकी २८ शाळांचा निकाल हा १०० टक्के आहे. मनपाच्या १,५०५ विद्यार्थ्यांपैकी १,५०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
...
प्राविण्यप्राप्त विद्यार्थी (अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय)
मराठी माध्यम : सुहानी गोसावी भगत (९४.२० टक्के, डॉ. राममनोहर लोहिया मनपा मराठी माध्यमिक शाळा), सलोनी महादेव कांबळे (९३.६० टक्के, बॅ. शेषराव वानखेडे मराठी माध्यमिक शाळा), प्रीती शिवचरण गणवीर (९३.४० टक्के, शिवणगाव मनपा मराठी माध्यमिक शाळा)
हिंदी माध्यम : स्वाती विनोद मिश्रा (९०.६०टक्के), काजल रामनरेश शर्मा (८९ टक्के), रिझवाना खातुन खैरुद्दीन अन्सारी (८६.६० टक्के, तिघेही सुरेंद्रगड हिंदी माध्यमिक शाळा)
उर्दू माध्यम : बुशरा फातीम अजीज खान (९२ टक्के, गंजीपेठ मनपा उर्दू माध्यमिक शाळा), झिक्रा फातिमा अन्वर जलील (९१.२० टक्के, एम. ए. के. आझाद मनपा उर्दू माध्यमिक शाळा), मसर्रत मो. वकील (९१.२० टक्के, साने गुरूजी उर्दू माध्यमिक शाळा), अदीबा अनीस अन्सारी रजा अनीस अन्सारी (९१ टक्के, एम. ए. के. आझाद मनपा उर्दू माध्यमिक शाळा).
इंग्रजी माध्यम : सानिया परीन मो. इम्तियाज (९५.८० टक्के), लक्ष्मी अरुणकुमार चव्हाण (८३.२० टक्के), मोहम्मद हाशीर मो. फजील (८३.२० टक्के, तिघेही जी. एम. बनातवाला शाळा) दिव्यांग विद्यार्थी : शिवम सिरसलाल उरकुडे (८३ टक्के, डॉ. आंबेडकर मराठी माध्यमिक शाळा).
मागासवर्गीय विद्यार्थी : सलोनी महादेव कांबळे (९३.६० टक्के, बॅ. शेषराव वानखेडे मराठी माध्यमिक शाळा)