लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पांढरकवड्याला जाताना व येताना दोन वेळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यादरम्यान विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सकाळी ९.५० वाजता भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने नवी दिल्लीवरून नागपूरच्या विमानतळावर पोहोचले. यावेळी विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि महापौर नंदा जिचकार यांनी स्वागत केले. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, अतिरिक्त पोलीस महासंचालक परमवीर सिंह, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनीही पंतप्रधानांचे स्वागत केले. स्वागतानंतर पंतप्रधान मोदी वायुसेनेच्या विशेष हेलिकॉप्टरने पांढरकवड्याला रवाना झाले. दुपारी १.३० वाजता ते हेलिकॉप्टरनेच पांढरकवड्यावरून नागपूरला पोहोचले आणि वायुसेनेच्या विशेष विमानाने जळगावला रवाना झाले. यादरम्यान विमानतळावर राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, महापौर नंदा जिचकार, पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, जिल्हाधिकारी अश्विन मुदगल उपस्थित होते.
पंतप्रधान मोदी दोनदा नागपूर विमानतळावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 1:05 AM
पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पांढरकवड्याला जाताना व येताना दोन वेळा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. यादरम्यान विमानतळ परिसरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
ठळक मुद्देहेलिकॉप्टरने गेले पांढरकवड्याला तर जळगावला विमानाने