शहरं
Join us  
Trending Stories
1
“शिंदे, फडणवीस सर्वांसमोर उमेदवार देऊ, २८८ जागा लढू, राज्यात महाशक्तीचा CM दिसेल”: बच्चू कडू
2
“अमूल तूप कधीही तिरुपतीला पाठवलेले नाही”; लाडू प्रसाद वादावर कंपनीने दिले स्पष्टीकरण
3
आतिशी दिल्लीच्या मुख्यमंत्री बनल्या, पण सरकार चालवण्यासाठी असतील मोठी आव्हाने!
4
IND vs BAN : पंत OUT होणार असं समजून राहुलची तयारी पण फजिती; सिराजला पिकला हशा, Video
5
PM मोदी - मुहम्मद युनूस यांच्यात अमेरिकेत बैठक नाही, बांगलादेशने पुढे केलं 'हे' कारण
6
दिल्लीला मिळाल्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री! आतिशी यांच्यासह आणखी ५ मंत्र्यांनी घेतली शपथ
7
काँग्रेस नेते राजभवनावर, घेतली राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट; पण नेमके कारण काय?
8
जिंकलंस मित्रा! वकील बनून लढला स्वत:च्या किडनॅपिंगची केस, १७ वर्षांनंतर ८ गुन्हेगारांना शिक्षा
9
ENG vs AUS : WHAT A BALL! स्टीव्ह स्मिथ 'क्लिन बोल्ड', ऑस्ट्रेलियन दिग्गजाचाही विश्वास बसेना
10
"म्यानमारमधून ९०० कुकी अतिरेकी मणिपूरमध्ये घुसले", सुरक्षा सल्लागारांनी दिला दुजोरा, चिंता वाढली
11
58 कर्मचाऱ्यांशी शारीरिक संबंध अन्...! कोण आहे चीनची ही 'सुंदर गव्हर्नर'? ठोठावण्यात आली 13 वर्षांची शिक्षा
12
“ज्याच्या जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र मविआत नाही”; संजय राऊत स्पष्टच बोलले
13
हवाई दल प्रमुखपदी एअर मार्शल अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती; जाणून घ्या, त्यांच्याविषयी...
14
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
15
भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'
16
IND vs BAN, 1st Test Day 3 Stumps : वेळेआधी थांबला खेळ; ढगाळ वातावरणातही चित्र एकदम स्पष्ट
17
बाबो! इन्स्टावर सूत जुळलं, एकमेकांवर प्रेम जडलं; पंक्चरवाल्यासाठी नवऱ्याला सोडलं अन्...
18
लेडीज टॉयलेटमध्ये कॅमेरा लावला; मुलीने रंगेहाथ पकडला, विद्यार्थ्याला अटक, अनेक व्हिडीओ सापडले
19
ऐश्वर्या-करीश्मादेखील वाचवू शकले नाहीत सुपरस्टारच्या मुलाचं करिअर, आता इंडस्ट्रीतून आहे गायब
20
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

पंतप्रधान मोदी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर, पीएम-किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरण

By योगेश पांडे | Published: February 27, 2024 9:22 PM

वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे उद्घाटन : मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते विविध योजनांचे लोकार्पण करण्यासोबतच पीएम-किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरणदेखील करतील. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास नागपूर रोडवरील डोरली येथे प्रधानमंत्री महोदयांसमवेत यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण करण्यात येईल.

पंतप्रधान तामिळनाडू येथून दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने पोहोचतील. तेथून ते हेलिकॉप्टरने जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅडकडे रवाना होतील व दुपारी ४.२५ वाजता तेथे पोहोचतील. तेथून कडक बंदोबस्तात त्यांचा ताफा डोरलीकडे जाईल. पावणेसहा वाजेपर्यंत पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होईल. सायंकाळी सहा वाजता ते हेलिपॅडवरून प्रयाण करतील. या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर प्रामुख्याने उपस्थित राहतील.

यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजने अंतर्गत १६ व्या हप्त्याची २१ हजार कोटींहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. सोबतच पंतप्रधान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे ३,८०० कोटी रुपयांचा दुसरा व तिसरा हप्तादेखील वितरित करतील. महाराष्ट्रातील ८८ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

१३०० कोटींहून अधिकच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनपंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील तेराशे कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही होईल. यात वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग असलेला वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आणि अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग असलेल्या नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दोन रेल्वे सेवांना दूरदृश्यप्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

हजारो कोटींच्या निधीचे वितरण- पंतप्रधान महाराष्ट्रातील साडेपाच लाख महिला बचत गटांना ८२५ कोटी इतका फिरता निधी वितरित करतील. हा निधी बचत गटा अंतर्गत फिरत्या तत्त्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो.-पंतप्रधान महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील.-पंतप्रधान महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करतील. आर्थिक वर्ष २०२३-२४ ते आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान एकूण १० लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे. या योजनेच्या अडीच लाख लाभार्थ्यांना ३७५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करण्यात येईल.-पंतप्रधान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करतील. हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जल संजीवनी योजनेअंतर्गत २,७५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत.- पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग -९३० च्या वरोरा-वणी विभागाचे चौपदरीकरण, आणि साकोली-भंडारा आणि सालईखुर्द-तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे.- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या यवतमाळ शहरातील पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीYavatmalयवतमाळ