शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इंदिराजींच्या कार्यक्रमांवर लावली बंदी  - कुमार केतकर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2017 2:18 PM

देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्या इंदिरा गांधी यांनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घेऊ नका, असे आदेशच काढले आहेत, असं विधान ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले आहे. 

नागपूर - देशाच्या पंतप्रधान म्हणून ज्या इंदिरा गांधी यांनी १७ वर्षे काम केले, त्यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे सौजन्य सध्याचे सरकार दाखवत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर शासकीय कार्यालयांमध्ये इंदिराजींचे कार्यक्रम घेऊ नका, असे आदेशच काढले आहेत, असं विधान ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केले आहे. ''नेहरू, इंदिराला विरोध करणारे हे लोक २०१९ मध्ये पुन्हा सत्तेत आले तर देशाचा इतिहास बदलतील. देशाला स्वातंत्र्य गांधींनी नव्हे तर गोळवलकर गुरुजींनी मिळवून दिले, असा इतिहास पाठ्यपुस्तकातून शिकवतील. काँग्रेसमुक्त देश करण्याच्या घोषणा देऊन यांना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहासच पुसायचा आहे'', अशी घणाघाती टीका ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी केली. 

धनवटे नॅशनल कॉलेज व राजीव गांधी स्टडी सर्कलतर्फे दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. अध्यक्षस्थानी डॉ. बबनराव तायवाडे होते. या वेळी माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अनंतराव घारड, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष शरद वानखेडे, निलेश कोढे उपस्थित होते.

या वेळी केतकर म्हणाले, पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या काळात झालेली सर्व कामे पुसण्याचा प्रयत्न सुरू आहे. महिन्यातून एकदा ‘मन की बात’ करून मोठे होण्याच्या पंतप्रधान मोदी यांचा भ्रम लवकरच दूर होणार आहे. नेहरु, इंदिरा, राजीव यांना स्वातंत्र्य लढ्याचा व राष्ट्र उभारणीचा एक इतिहास आहे. राहुल गांधी यांच्यावर सातत्याने टीका करून हा वारसा संपवण्याचा प्रयत्न होत आहे. जे लोक लष्करी हुकुमशाही मानणारे आहेत, तेच लोक लोकशाहीच्या मार्गाने सत्तेत आले असून आता हुकुमशाही लादू पाहत आहेत. अनिवासी भारतीयांना स्वांतंत्र्याचा लढा समृद्ध केला, हे राहुल गांधी यांनी केलेले विधान बरोबर आहे. आरएसएसची संकल्पनाही एनआरआय कडूनच घेण्यात आली असल्याचा दावा त्यांनी केला. 

खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दहशतीत - मोदींना त्यांच्याच पक्षातील खासदारांचा पाठिंबा नाही. मोदींच्या दहशतीमुळे ते दबून आहेत. खासदार नाना पटोले यांनी ते उघडपणे बोलून दाखविले. यशवंत सिन्हा, अरुण शौरी, शत्रुघ्न सिन्हा हे पक्षातील नेते उघडपणे भूमिका घेऊ लागले आहेत. देश काँग्रेसमुक्त तर होणार नाहीच पण ज्या दिवशी मोदींचे पंतप्रधान पद जाईल त्या दिवशी भाजपाच्या विसर्जनास सुरुवात होईल, अशी टीका केतकर यांनी केली.  

...तर संघच मोदींना बदलेल- इंदिराजींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा काँग्रेसला ४१ टक्के मते मिळाली होती. मोदींना २८२ जागा मिळाल्या तेव्हा भाजपाला ३१ टक्के मते मिळाली आहेत. मोदींच्या भूलथापांमुळे भाजपाला अतिरिक्त १०० जागा मिळाल्या. आता भ्रमनिरास होऊन ही मते माघारी फिरत आहेत. शायनिंग इंडियाच्या वेळी प्रमोद महाजन ३५० जागा जिंकणार असल्याचे सांगत होते. प्रत्यक्षात १३८ जागा आल्या. आताही भाजपाची अपेक्षा तेवढीच आहे. मात्र, १८० वर जागा मिळणार नाही. तसे झाले तर संघच मोदींना बदलण्याची मागणी करेल. कारण, नियोजन आयोगाप्रमाणे मोदी रेशीमबागही विसर्जित करून टाकतील, अशी संघाला भिती आहे, असेही केतकर म्हणाले. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाGovernmentसरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार