शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

पंतप्रधान नागपूरच्या मेट्रो रेल्वेत बसणार, मेट्रो धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2019 1:23 AM

मेट्रो रेल्वेच्या खापरी ते सीताबर्डी या १२.८७० कि़मी. रिच-१ मार्गावर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महामेट्रोच्या उद्घाटनाची तयारी वेगात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मेट्रोत बसणार आणि मेट्रो धावणार असे चित्र आहे. मेट्रो रेल्वेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता, हे विशेष.

ठळक मुद्देपंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन : फेब्रुवारी अखेरपर्यंत खापरी ते सीताबडीपर्यंत व्यावसायिक रन

मोरेश्वर मानापुरे/लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मेट्रो रेल्वेच्या खापरी ते सीताबर्डी या १२.८७० कि़मी. रिच-१ मार्गावर मेट्रो रेल्वेचा व्यावसायिक रन फेब्रुवारीच्या अखेरीस सुरू होणार असून उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. महामेट्रोच्या उद्घाटनाची तयारी वेगात सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मेट्रोत बसणार आणि मेट्रो धावणार असे चित्र आहे. मेट्रो रेल्वेचा पायाभरणी समारंभ पंतप्रधानांच्या हस्ते झाला होता, हे विशेष.सरासरी ९८ टक्के काम पूर्णया दृष्टीने मेट्रोचे बांधकाम वेगात सुरू आहे. एकूण १० वर्गवारीपैकी सात विभागाचे काम १०० टक्के अर्थात ५५८ पाईल, २६६ ओपन फाऊंडेशन, १२७ पाईल कॅप, ३५६४ सेगमेंट कास्टिंग, १४९ आय-गर्डर कास्टिंग, १४९ आय-गर्डर लॉन्चिंग आणि ३३ डेक स्लॅब कास्टिंगचे काम पूर्ण झाले आहे. याशिवाय ३९३ पिअरपैकी ३८८ पिअर (९८.७३ टक्के), ३१८ पाईप कॅप व पोर्टलपैकी ३०८ (९६.८६ टक्के) आणि ३४५ सेगमेंट लॉचिंगपैकी ३०९ चे (८९.५७ टक्के) काम पूर्ण झाले आहे.‘सीआरएस’तर्फे लवकरच परीक्षणरिच-१ च्या १२.८७० कि़मी. मार्गावर लवकरच खापरी ते एअरपोर्ट साऊथप्रमाणेच प्रवाशांच्या वजनाएवढे रेतीच्या वजनाचे पोते टाकून ऑसिलेशन ट्रायल रन होणार आहे. त्याकरिता लखनौ येथील रिसर्च डिझाईन अ‍ॅण्ड स्टॅण्डर्ड ऑर्गनायाझेशनची (आरडीएसओ) चमू येणार आहे. त्यानंतर कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीतर्फे (सीआरएस) फायरच्या अटी, रोलिंग स्टॉल आणि विविध बाबींचे परीक्षण करण्यात येणार आहे. सीआरएसच्या मंजुरीनंतर मेट्रो रेल्वे व्यावसायिकरीत्या धावण्यासाठी तयार होणार आहे. ट्रॅकचे काम १० दिवसात तर उर्वरित कामे १५ ते २० दिवसात पूर्ण होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.एकूण ११ स्टेशन, १२.८७० कि़मी.खापरी ते सीताबर्डी मेट्रो रेल्वे मार्ग १२.८७० कि़मी.चा असून या मार्गावर एकूण ११ स्टेशन आहेत. यामध्ये खापरी, न्यू एअरपोर्ट, एअरपोर्ट साऊथ, एअरपोर्ट, उज्ज्वलनगर, जेपी नगर, छत्रपती स्टेशन, अजनी, रहाटे कॉलनी, काँग्रेसनगर, सीताबर्डी.फेब्रुवारी अखेरीस व्यावसायिक रननिर्धारित मार्च महिन्याऐवजी फेब्रुवारी अखेरपर्यंत खापरी ते सीताबर्डीपर्यंत व्यावसायिक रन सुरू करण्याचा महामेट्रोचा प्रयत्न आहे. त्याची तयारी जोमात आहे. बांधकाम वेगात सुरू आहे. तिकीट दर २०१४ मध्ये ठरल्यानुसार राहतील.डॉ. बृजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक,महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMetroमेट्रो