शहरं
Join us  
Trending Stories
1
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
2
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
3
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
4
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
5
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
6
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
7
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
8
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
9
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
11
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
12
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
13
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
14
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
15
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

प्राचार्य वानखेडेंची भररस्त्यात हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 04, 2017 1:03 AM

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपुरात नोकरी करणाºया नागपुरातील एका प्राचार्याची शुक्रवारी पहाटे बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाली. मारेकºयांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला धडक मारली आणि नंतर त्यांचा गळा धारदार शस्त्राने कापला. या थरारक हत्याकांडामुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. मोरेश्वर महादेवराव वानखेडे (वय ५७) असे मृत प्राचार्यांचे ...

ठळक मुद्देनीरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पहाटेचा थरार : कौटुंबिक कलहाशी हत्याकांडाचे जुळले तार ?

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चंद्रपुरात नोकरी करणाºया नागपुरातील एका प्राचार्याची शुक्रवारी पहाटे बजाजनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर भीषण हत्या झाली. मारेकºयांनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या दुचाकीला धडक मारली आणि नंतर त्यांचा गळा धारदार शस्त्राने कापला. या थरारक हत्याकांडामुळे उपराजधानीत खळबळ उडाली आहे. मोरेश्वर महादेवराव वानखेडे (वय ५७) असे मृत प्राचार्यांचे नाव आहे. ते चंद्र्रपूर (तुकूम) मधील खत्री महाविद्यालयात प्राचार्य म्हणून सेवारत होते.नागपुरातून ते येणे-जाणे करीत होते. भल्या सकाळी ते दुचाकीने रेल्वेस्थानकावर जायचे आणि तेथून ते रेल्वेने चंद्रपूरला जायचे. रात्री ७.३० च्या सुमारास ते परत येत होते. नरेंद्रनगरातील म्हाडा कॉलनीत प्रा. वानखेडे राहायचे. नेहमीप्रमाणे शुक्रवारी पहाटे ४ वाजता ते घरून दुचाकीने रेल्वेस्थानकाकडे निघाले. छत्रपती चौकातून ते नीरीमार्गे रेल्वेस्थानकाकडे जात होते. ४.४५ वाजता नीरीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ त्यांच्या दुचाकीला हल्लेखोरांनी धडक मारली. हल्लेखोरांनी त्यांना कसलीही संधी न देता धारदार शस्त्राने त्यांचा गळा कापून पळ काढला. एक व्यक्ती रक्ताच्या थारोळ्यात पडून दिसल्याने मॉर्निंग वॉक करणाºयांनी नियंत्रण कक्षाला कळविले. त्या माहितीवरून प्रारंभी धंतोली आणि नंतर बजाजनगर पोलीस घटनास्थळी धावले. त्यांनी वानखेडे यांना बघितले असता ते मृतावस्थेत आढळले. मारेकºयांनी त्यांचा गळा कापला होता. पोलिसांनी त्यांना मेडिकलमध्ये नेले. त्यांच्या खिशातील कागदपत्रांवरून त्यांची ओळख पटली. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या घरी कळवले. एका प्राचार्याची हत्या झाल्याचे वृत्त पसरल्याने उपराजधानीत खळबळ उडाली.सुपारी दिल्याचा संशयएवढ्या पहाटे प्रा. वानखेडे यांची हत्या कुणी आणि कोणत्या कारणामुळे केली असावी, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बजाजनगर आणि गुन्हे शाखेचे पोलीस त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी शुक्रवारी दिवसभर प्रयत्नरत होते. पोलिसांच्या दिवसभराच्या चौकशीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या. प्रा. वानखेडे यांची पत्नी अनिता यादेखील प्राध्यापक आहेत. त्यांना शामली नामक विवाहित मुलगी असून, तिला चार वर्षांची मुलगी आहे. पतीशी मतभेद झाल्यामुळे ती वडिलांकडे राहत आहे. दुसरा मुलगा तन्मय बारावीचा विद्यार्थी आहे. कौटुंबिक कलहाचा पैलूही या हत्याकांडाशी जुळला असून, पोलिसांकडे अनेक दुवे उपलब्ध आहेत. सुपारी देऊन ही हत्या केल्याचा संशयही व्यक्त होत आहे. काही तासातच आरोपी अटक करू, असा विश्वास वरिष्ठ पोलीस अधिकारी वर्तवित आहेत.