शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
10
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
11
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
12
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
13
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
14
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
15
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
17
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
18
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
19
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
20
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...

निडोज बारवर छापा

By admin | Published: July 01, 2017 2:04 AM

जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंजे चौकातील निडोज बार अ‍ॅन्ड

जिल्हाधिकाऱ्यांचा दणका डान्सबार सापडला ? चार तरुणी ताब्यात, मद्यसाठा जप्त एक्साईज आणि पोलिसांची कारवाई लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मुंजे चौकातील निडोज बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंटमध्ये शुक्रवारी रात्री राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या मदतीने छापा घातला. यावेळी तेथे काही तरुणी आणि मद्याच्या बाटल्यांसह आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. या कारवाईमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. मुंजे चौकातील महाराष्ट्र बँकेच्या बाजूला असलेले निडोज बार आणि रेस्टॉरंट ५०० मीटरच्या मर्यादेच्या अटीमुळे बंद पडले आहे. हा बार राजू जयस्वाल यांच्या मालकीचा आहे. या बंद पडलेल्या बारमध्ये डान्स बार तसेच अनैतिक प्रकार सुरू आहे, अशी गोपनीय माहिती जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांना शुक्रवारी रात्री मिळाली. या माहितीच्या आधारे त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्वाती काकडे यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यावरून काकडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने शुक्रवारी रात्री ९.४५ वाजता निडोज बारमध्ये छापा घातला. बेसमेंट आणि दोन माळे अशी रचना असलेल्या निडोजच्या इमारतीत यापूर्वी आॅर्केस्ट्रा चालायचा. वरच्या माळ्यावर काही शयनकक्षही आहेत. तेथे आॅर्केस्ट्रात काम करणाऱ्या तरुणी मुक्कामी राहायच्या. छापा घालणाऱ्या अधिकाऱ्यांना तेथे चार तरुणी आणि अन्य काही जण दिसल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांना मदतीसाठी बोलवून घेतले. त्यानुसार, पोलीस उपायुक्त राकेश ओला यांनी एसीपी राजेश बोरावके यांना पोलीस ताफ्यासह पाठविले. मध्यरात्री १२ पर्यंत तेथे कारवाई सुरू होती. यावेळी पोलिसांनी बेसमेंटमध्ये तरुणींची चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेऊन धंतोली ठाण्यात नेले. बार बंद असूनही तेथे मोठ्या प्रमाणात महागड्या दारूच्या बाटल्या आणि आक्षेपार्ह साहित्य मिळाल्याची माहिती आहे. ते जप्त करण्यात येणार असून, ही कारवाई मुळात राज्य उत्पादन शुल्क विभागाची आहे. पोलीस त्यांच्या मदतीसाठी आल्याचे एसीपी बोरावके यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान, ही चर्चा सर्वत्र पसरल्याने मोठ्या प्रमाणात तेथे गर्दी जमली. रात्री १२.१५ वाजता पोलीस उपायुक्त राकेश ओला तेथे पोहचले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांसोबत काय कारवाई केली, त्याची माहिती जाणून घेतली.