लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हंसापुरीतील बनावट आधार कार्ड छपाई केंद्रावर महसूल आणि पोलिसांच्या पथकाने छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड तसेच स्टॅम्प आणि प्रिंटर, स्कॅनर जप्त केले. या प्रकरणी चंद्रकांत पराते (वय ३५, रा. बागल आखाडाजवळ, पाचपावली मार्ग) आणि त्याचा नोकर तुषार फुलचंद हेडावू (वय १९, रा. टिमकी, दादरापूल) या दोघांविरुद्ध तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला.हंसापुरीत बनावट आधार कार्ड बनविले जात असल्याची गोपनीय माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली होती. त्याची शहानिशा केल्यानंतर प्रभाकर लहानुजी कुबडे (वय ५६) यांनी जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक (आयटी सेल) उमेश घुग्गुसकर आणि सिनियर सपोर्टर इंजिनिअर संदीप कोहळे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह गुरुवारी दुपारी १२. ४५ वाजता हंसापुरीतील टिमकी भागात असलेल्या हंसापुरी प्राथमिक शाळेजवळ परातेच्या दुकानावर छापा मारला.तेथे पराते काही लोकांना बनावट आधार कार्डचे वाटप करताना आढळला. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड, स्टॅम्प (शिक्के), स्कॅनर, प्रिंटर आणि अन्य साहित्य महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले.परिसरात खळबळआपल्या भागात बनावट आधार कार्ड बनविले जात होते, ही माहिती कळाल्याने परिसरात प्रचंड खळबळ निर्माण झाली. त्याचप्रमाणे परातेकडून ज्यांनी आधार कार्ड घेतले, त्याचा वापर आता गैरवापर ठरणार काय, त्यामुळे कोणते दुष्परिणाम होतील, त्याचीही हंसापुरीत चर्चा सुरू झाली.
उपराजधानीत चक्क बनावट आधारची छपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2019 10:47 AM
हंसापुरीतील बनावट आधार कार्ड छपाई केंद्रावर महसूल आणि पोलिसांच्या पथकाने छापा मारून तेथून मोठ्या प्रमाणात बनावट आधार कार्ड तसेच स्टॅम्प आणि प्रिंटर, स्कॅनर जप्त केले.
ठळक मुद्देजिल्हा प्रशासनाचा केंद्रावर छापातहसील ठाण्यात गुन्हा दाखल