शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
2
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
3
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
4
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
5
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
6
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
7
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
8
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
9
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
10
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
12
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
13
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
14
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
15
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
16
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
17
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
18
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
19
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
20
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान

शांतिवनातील वस्तू संग्रहालयाचे आचारसंहितेपूर्वी लोकार्पण : राजकुमार बडोले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 03, 2019 11:35 PM

शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाच्या नवनिर्मित अत्याधुनिक इमारती परिसरातील विविध वास्तूंचे लोकार्पण कुठल्याही परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होईल, असा दावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केला.

ठळक मुद्देदीड महिन्यात काम संपविण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तू संग्रहालयाच्या नवनिर्मित अत्याधुनिक इमारती परिसरातील विविध वास्तूंचे लोकार्पण कुठल्याही परिस्थितीत येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी होईल, असा दावा राज्याचे सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी केला.शांतिवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय व प्रकल्पातील विकास कामांचा आढावा घेण्यासाठी सोमवारी दीक्षाभूमी परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्यायभवनात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले, शांतिवन चिचोली येथील काम प्रगतिपथावर आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे कामांचा आढावाही घेण्यात येत आहे. येत्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी कोणत्याही परिस्थितीत त्याचे लोकार्पण केले जाईल. त्याचप्रकारे उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटर याचे कामही बरेच रेंगाळले आहे. दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. ते काम तातडीने व्हावे असे आपले प्रयत्न आहे. या सर्व कामांचा आढावा आपण आज घेत असून, अधिकाऱ्यांना तसे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.शांतिवन चिचोली येथील उर्वरित कामे तातडीने पूर्ण करा. त्यासाठी जास्तीचे मजूर लावा. परंतु कोणत्याही परिस्थितीत येथील कामे दीड महिन्यात संपायलाच हवी, असे निर्देश सामाजिक न्यायमंत्रीराजकुमार बडोले यांनी आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीत दीक्षाभूमीच्या विकास कामांचाही आढावा घेण्यात आला.या बैठकीत नासुप्रचे वास्तू विशारद संदीप कांबळे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त डॉ. सिद्धार्थ गायकवाड उपस्थित होते.समता प्रतिष्ठानचे कार्यालय कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हलवाउत्तर नागपुरातील १२५ कोटी रुपयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचे काम संथगतीने सुरू आहे. दोनवेळा मुदतवाढ मिळली आहे, तरीही काम पूर्ण झालेले नाही. या कन्व्हेन्शन सेंटरचे काम तातडीने पूर्ण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठानचे कार्यालय तिथे सुरू करा, असे निर्देशही राजकुमार बडोले यांनी यावेळी दिले. तसेच संत चोखामेळा वसतिगृहाच्या नवीन इमारतीच्या कामाचे भूमिपूजन या महिन्याच्या शेवटी सुरू करा, असे निर्देशही दिले.

टॅग्स :Rajkumar Badoleराजकुमार बडोलेministerमंत्री