शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

आदिवासीची जमीन आदिवासीला विकण्यासाठीही पूर्वपरवानगी हवी - हायकोर्ट

By राकेश पांडुरंग घानोडे | Published: April 17, 2023 6:23 PM

फेरफार कायम ठेवण्याची मागणी फेटाळली

नागपूर : आदिवासीची जमीन आदिवासीला विकण्यासाठीही जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका प्रकरणात दिला. तसेच, जमीन खरेदीदाराने स्वत:च्या नावाचा फेरफार कायम ठेवण्यासाठी दाखल केलेली याचिका फेटाळून लावली.

प्रकरणावर न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांच्यासमक्ष सुनावणी झाली. आदिवासी घनश्याम ससाणे यांनी वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुका स्थित हिवरा खुर्द येथील शेषराव व दिलीप ससाणे या आदिवासी भावांची शेतजमीन २ लाख ८० हजार रुपयात खरेदी केली होती. २९ एप्रिल २०१३ रोजी जमिनीचे विक्रीपत्र झाले होते. त्यानंतर तलाठ्याने २ मे २०१५ रोजी घनश्याम यांच्या नावाने त्या जमिनीचा फेरफार केला. दरम्यान, शेषराव यांनी आदिवासीची जमीन जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय विकता येत नसल्याचा आक्षेप घेतला.

आधी उप-विभागीय अधिकाऱ्यांनी व नंतर अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांनी तो आक्षेप अमान्य केला. परंतु, अमरावती विभागाचे अतिरिक्त आयुक्तांनी २ मार्च २०२१ रोजी शेषराव यांचा अर्ज मंजूर करून वादग्रस्त फेरफार अवैध ठरवला. परिणामी, घनश्याम यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर हा निर्णय देण्यात आला. शेषरावतर्फे ॲड. आनंद देशपांडे यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :Courtन्यायालयHigh Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरwashimवाशिम