शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

जेल बे्रकचा छडा लागला

By admin | Published: May 15, 2015 2:32 AM

मध्यवर्ती कारागृहातून दीड महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या पाच खतरनाक कैद्यांपैकी दोघांना तसेच त्यांच्यासोबतच्या अन्य एका गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले.

पळून गेलेल्यांपैकी दोघे अडकले : एक साथीदारही गजाआडनागपूर : मध्यवर्ती कारागृहातून दीड महिन्यांपूर्वी पळून गेलेल्या पाच खतरनाक कैद्यांपैकी दोघांना तसेच त्यांच्यासोबतच्या अन्य एका गुन्हेगाराला अटक करण्यात पोलिसांनी यश मिळवले. शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान (वय २४, रा. मानकापूर) आणि प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री (वय २४, रा. नेपाळ) अशी ‘जेल ब्रेक’मधील आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून एक माऊझर, दोन कट्टे आणि दहा काडतुसेही जप्त केली. पोलीस आयुक्त शारदा प्रसाद यादव यांनी गुरुवारी सायंकाळी पत्रकारांना ही माहिती दिली.शिबू ऊर्फ मोहम्मद शोएब सलीम खान, प्रेम ऊर्फ नेपाली शालिकराम खत्री, सत्येंद्र ऊर्फ राहुल राजबहादूर गुप्ता (वय २५, रा. कामठी, नागपूर), बिशनसिंग रम्मूलाल उके (रा. धुमाळ, जि. शिवनी मध्य प्रदेश) आणि गोलू ऊर्फ आकाश रज्जूसिंग ठाकूर (वय २३, रा. नागपूर) हे पाच कैदी ३१ मार्चच्या पहाटे मध्यवर्ती कारागृहातून पळून गेले होते. हे सर्व कारागृहाच्या बराक क्रमांक ६ मध्ये १५४ कैद्यांसोबत बंदिस्त होते. पळून जाण्याचा कट कसा अंमलात आला, त्याची माहिती देताना पोलीस आयुक्त म्हणाले, कटाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी कारागृहाच्या आत चप्पलमध्ये आरी लवपून नेली. तब्बल सहा ते सात दिवस त्यांनी या आरीच्या माध्यमाने खिडकीची लोखंडी गज (सळाख) कापली. ती वाकविल्यानंतर त्यातून क्रमश: पाचही जण उड्या मारून बराकीच्या बाहेर आले. त्यांनी छोटी भिंत ओलांडली. त्यानंतर २३ फूट उंच असलेल्या भिंतीला दोघे टेकले. या दोघांवर पुन्हा दोघे चढले आणि त्यांच्यावर चढलेला एक जण भिंतीवर पोहोचला. कारागृहातील पाच ते सहा चादरींची त्यांनी दोरी बनविली आणि एकेक करीत सर्व त्या भिंतीवर चढून आरोपी पळून गेले. बाहेर असलेल्या त्यांच्या साथीदारांनी मोटरसायकलवर दोन चकरा मारून त्यांना बकरामंडीत पोहोचविले. तेथून ते छिंदवाड्याच्या बसमध्ये बसून नागपुरातून पळून गेले. पत्रकारांचा अपमान : आयुक्तालयात पत्रपरिषद सुरू होण्यापूर्वी पोलीस शिपाई जयंता शेलोट याने एका ज्येष्ठ वार्ताहरासोबत तसेच तत्पूर्वी, गुन्हेशाखेत गेलेल्या काही पत्रकारांना त्याने अर्वाच्य भाषेचा वापरअपमानित केले. आयुक्तांकडे पत्रकारांनी या गैरप्रकाराची तक्रार केली आहे. (प्रतिनिधी)मासे गळाला लागलेया घटनेनंतर आरोपींना जेरबंद करण्यासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र परिश्रम घेत होती. गुन्हे शाखेची पथके मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशसह विविध प्रांतात जाऊन आले. मात्र त्यांचा शोध लागेना. दरम्यान, पळून गेलेल्या शिबू आणि नेपाली आर्थिक अडचणीत असल्याचे कळाल्यामुळे पोलिसांनी त्यांच्या साथीदारांच्या मदतीने त्यांना ‘बडा गेम बजाना है’, असे आमिष दाखवून नागपूरकडे बोलविले. त्यानुसार शिबू, नेपाली आणि त्यांचा उत्तर प्रदेशातील एक साथीदार अरमान मुन्ना मलिक (वय २३, रा. जालौन) गुरुवारी सकाळी कोराडी जवळच्या बोखारा येथे पोहोचले. त्यांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून अन्य फरार गुन्हेगारांची आणि बरीच महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यताही पोलीस आयुक्त यादव यांनी व्यक्त केली. यावेळी सहपोलीस आयुक्त अनुपकुमार सिंग, अतिरिक्त आयुक्त श्रीकांत तरवडे, गुन्हे शाखेच्या उपायुक्त दीपाली मासीरकर उपस्थित होते.