शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

कैद्यांच्या मजुरीबाबत कारागृहांची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 10:40 AM

राज्यातील सर्व कारागृहे मिळून कैद्यांनी केलेल्या उत्पादनातून २९ कोटी ४० लाख इतकी मिळकत प्राप्त झाली. मात्र प्रत्यक्षात कौशल्य असलेल्या कैद्यांना दरदिवशी केवळ ६१ रुपये इतकेच पारिश्रामिक देण्यात आले.

ठळक मुद्देकुशल कैद्याला दिवसाला केवळ ६१ रुपयेच राज्य पिछाडीवर, कसे होणार पुनर्वसन?

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यातील विविध कारागृहांमध्ये प्रशिक्षण प्राप्त कैद्यांकडून विविध वस्तूंचे उत्पादन केले जाते. यात साधारणत: फर्निचर, हॅण्डलूमच्या वस्तू, ‘बेकरी प्रोडक्ट’ इत्यादींचा समावेश असतो. राज्यातील सर्व कारागृहे मिळून कैद्यांनी केलेल्या उत्पादनातून २९ कोटी ४० लाख इतकी मिळकत प्राप्त झाली. मात्र प्रत्यक्षात कौशल्य असलेल्या कैद्यांना दरदिवशी केवळ ६१ रुपये इतकेच पारिश्रामिक देण्यात आले. मिळकतीत राज्य पहिल्या तीनमध्ये असले तरी मजुरीच्या संदर्भात इतर राज्यांच्या तुलनेत हा आकडा फारच कमी असून विकासाच्या बाबतीत मागे असलेल्या राज्यांची आकडेवारी यापेक्षा बरीच चांगली आहे.‘एनसीआरबी’ने (नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरो) देशातील कारागृहांबाबत जारी केलेल्या २०१९ सालच्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. राज्यात एकूण १५४ विविध प्रकारची कारागृहे आहेत. यात ९ मध्यवर्ती कारागृहांसोबतच जिल्हा कारागृह, महिला कारागृह, बालसुधारगृह, विशेष कारागृह इत्यादींचा समावेश आहे. राज्यातील कारागृहांत सर्व प्रकारचे ३६ हजार ७९८ कैदी होते. सर्व कारागृह मिळून प्रति कैदी सुमारे आठ हजार रुपये किमतीच्या वस्तूंचे उत्पादन झाले. कारागृहांमध्ये कैदी विविध प्रकारची कामे करतात व त्यांची त्यांना मजुरीदेखील दिली जाते. महाराष्ट्रात कौशल्य असलेल्या कैद्याला प्रति दिवस ६१, तर कौशल्य नसलेल्या कैद्याला ४४ रुपयांची मजुरी देण्यात आली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत मजुरी देण्याच्या बाबतीत राज्याचा क्रमांक हा १८ वा आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम, बिहार, झारखंड, मेघालय, नागालँड यासारख्या राज्यांतदेखील दिवसाचे पारिश्रमिक महाराष्ट्राहून फार जास्त आहे. देशातील सरासरी मजुरी ही १०३.१९ रुपये (कुशल कैदी) व ८०.०६ रुपये (अकुशल कैदी) इतकी आहे.

 

 

टॅग्स :jailतुरुंग