कायद्याची पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला दणका !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2018 09:55 PM2018-02-14T21:55:32+5:302018-02-14T21:59:57+5:30

कायद्याची वारंवार पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. बंदिवानाची संचित रजेची विनंती फेटाळण्यात आली आहे.

A prisoner slapped for the violent law! | कायद्याची पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला दणका !

कायद्याची पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला दणका !

Next
ठळक मुद्देहायकोर्टाचा निर्णय : संचित रजेची विनंती फेटाळली





लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कायद्याची वारंवार पायमल्ली करणाऱ्या बंदिवानाला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दणका दिला आहे. बंदिवानाची संचित रजेची विनंती फेटाळण्यात आली आहे.
रामभरोसे ऊर्फ रंगा पन्नालाल मालविया (३७) असे बंदिवानाचे नाव असून तो कन्हान येथील रहिवासी आहे. बंदिवानाने वांरवार कायद्याचा भंग केल्यास संचित रजा मिळणे हा त्याच्या अधिकाराचा भाग रहात नाही. अशी प्रकरणे प्रशासनाच्या विवेकबुद्धीवर अवलंबून राहतात. प्रशासनाने दाखविलेल्या विवेकबुद्धीला ठोस आधार असल्यास त्यांच्या आदेशात हस्तक्षेप करण्यास वाव नसतो असे न्यायालयाने निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व मुरलीधर गिरटकर यांनी हा निर्णय दिला.
मालवियाला हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्याने आतापर्यंत ११ वर्षे १० महिन्यांवर शिक्षा भोगली आहे. २४ आॅगस्ट २०१७ रोजी सरकारने पोलीस पडताळणी अहवाल लक्षात घेता त्याचा संचित रजेचा अर्ज नामंजूर केला होता. त्यामुळे त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ती याचिका फेटाळण्यात आली. यापूर्वी मालवियाला ८ आॅगस्ट २००८ रोजी अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर करण्यात आली होती. त्यावेळी त्याने ११७ दिवस विलंबाने आत्मसमर्पण केले होते. तसेच, ७ सप्टेंबर २००९ रोजी संचित रजा (फर्लो) मंजूर केली असता त्याला अटक करून कारागृहात आणावे लागले होते. दरम्यान, तो १०५५ दिवस अवैधपणे कारागृहाबाहेर राहिला होता. त्यानंतर उच्च न्यायालयाने एकदा आरोपीची संचित रजा देण्याची विनंती फेटाळली होती.

Web Title: A prisoner slapped for the violent law!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.