लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राळेगाव जि. यवतमाळ वनक्षेत्रातील नरभक्षी वाघिणीला मारण्यासाठी खासगी शूटर नवाब शाफर अली खान यांच्या नियुक्तीचा तीव्र विरोध होत आहे. वन विभागातील वन अधिकारी खासगी शूटरच्या नियुक्तीच्या विरुद्ध उघडपणे बोलत नसले तरी ते सुद्धा नाराज आहेत. वाघिणीला शूट करण्यासाठी वन विभागातील अधिकारी किंवा पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती करायला हवी, असे त्यांचे म्हणणे आहे.दुसरीकडे वन्यजीवप्रेमी आणि वाईल्ड लाईफशी जुळलेले एनजीओचे प्रतिनिधीसुद्धा शूटर नवाब शाफर अलीच्या नियुक्तीच्या विरोधात उघडपणे मैदानात उतरले आहे. यासंबंधात विविध एनजीओच्या प्रतिनिधींनी सोमवारी वन मुख्यालयात प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) ए.के. मिश्रा यांची भेट घेतली आणि खासगी शूटरच्या नियुक्तीचा विरोध केला. याबाबत लेखी निवेदनही सादर केले. त्यांचे म्हणणे आहे की, वन विभागाकडे जेव्हा पोलिसांचे प्रशिक्षत एक्सपर्ट शूटर असताना बाहेरील खासगी शूटरला बोलावून लाखो रुपये खर्च करण्याची गरजच काय? शूटर नवाब नेहमीच वादग्रस्त शिकारी राहिलेला आहे. त्याच्याविरुद्ध नक्षलवाद्यांना शस्त्र पुरविल्या प्रकरणातही चार्जशीट दाखल झालेली आहे. विशेषत: एनटीसीएच्या एसओपीच्यानुसार शूटआऊटचे आॅर्डर जारी होताच शासकीय शूटरला प्राधान्य द्यायला हवे. सरकारी अधिकारी उपलब्ध नसेल तर खासगी व्यक्तीची सेवा घ्यावी. परंतु वन विभागाकडे चंद्रपूरमध्येच ट्रॅक्युलाईज टीममध्ये पोलीस विभागाचे शॉर्प शूटर अजय मराठे आहेत. सूत्रानुसार पोलीस कॉन्स्टेबल अजय मराठे यांनी त्यांच्या व्हेटरनरी डॉक्टर चमूसोबत अनेक शूटआऊट आॅपरेशन यशस्वी केले आहेत. सहा महिन्यांपूर्वी ब्रम्हपुरीतील सितारी गावात एका अस्वलाने चार लोकांचा जीव घेतला होता तर चार ते पाच लोकांना जखमी केले होते. या अस्वलाला अतिशय बिकट परिस्थितीत शूटर मराठे यांनी शूट (बेशुद्ध) केले. त्यापूर्वी ताडोबाला लागून असलेल्या वडसा क्षेत्रामध्ये तीन लोकांना मारणाऱ्या वाघिणीलाही मराठे आणि त्यांच्या चमूनेच तीन दिवसात ट्रॅक्युलाईज (बेशुद्ध) केले होते. त्याचप्रकारे ताडोबातील सिवनी क्षेत्रात वाघिणीला शूटआऊटचे आॅर्डर देण्यात आले होते. मराठे व त्यांच्या चमूने सात दिवसात हल्लेखोर वाघिणीला बेशुद्ध करून गोरेवाडा रेस्क्यू सेंटरमध्ये आणले होते. त्यामुळे मराठे डेप्युटेशनवर ताडोबा (एसटीपीएफ) टीमसोबत तैनात आहेत.या टीमने डझनभर वाघ, बिबट, भालू यंना ट्रॅक्युलाईज केले आहे. या वाघिणीला मारण्यासाठी टी- ६० कमांडो शूटरची मदत घेण्यात आली आली होती.आतापर्यंत पोलीसांच्या मदतीने चार शूटआऊट१) ताडोबा (वर्ष १९९५) - पोलीस२) तळोधी ब्रम्हपुरी (२००६) - पोलीस३) नवेगाव - पोलीस४) कोंभुरणा (२०१३ ) टी-६० कमांडो‘नवाब’ प्रेमामुळे वन्यजीव प्रेमी संतप्तवन्यजीव प्रेमी व मनसे पदाधिकारी सोमवरी पीसीसीएफ मिश्रा यांना भेटले. त्यांनी शिष्टमंडळाला संगितले की, चार पोलीसांचे शूटरही नवाबसोबत आहेत. परंतु पाँढरकवडा पोलीसांशी संपर्क साधला असता पोलीस अधिकाऱ्यांनी वाघिनला शूट करण्यासाठी कुठलाही अधिकारी देण्यात आलेला नही, असे सांगितले. शिष्टमंडळात मनसे जिल्हाध्यक्ष किशोर सरायकर, संजय देशपांडे, विनीत अरोरा आदी उपस्थित होते. सरायर यांनी पीपीसीएफर यांच्यावर चुकीची माहिती देत असल्याचा आरोप करीत तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.