शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

प्रियंकाला मिळाला न्यायाधीश होण्याचा बहुमान

By admin | Published: April 17, 2017 2:13 AM

घरी चार महिन्यांचा तान्हुला आणि तीन वर्षांची चिमुकली. एकीकडे एमपीएससीच्या परीक्षेचा ताण 1

उमरेडमधील पहिली महिला न्यायाधीश : एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातून अठरावी अभय लांजेवार  उमरेड घरी चार महिन्यांचा तान्हुला आणि तीन वर्षांची चिमुकली. एकीकडे एमपीएससीच्या परीक्षेचा ताण तर दुसरीकडे दोन्ही मुलांचा सांभाळ आणि घरसंसार! अशाही परिस्थितीत ‘ती’ जिद्दीला भिडली. चिकाटीने तासन्तास अभ्यास केला. प्रत्येक परीक्षेला सामोरे गेली आणि तिला चक्क न्यायाधीश म्हणून रिकमेन्डेशन मिळाले. कुटुंबीयांच्या आणि तिच्या आनंदाला पारावर उरला नाही. उमरेड परिसरातून एक महिला न्यायाधीश म्हणून पहिला बहुमान प्रियंका राजीव भोंबे हिला मिळाला. वयाच्या अवघ्या तिसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात प्रियंकाने महाराष्ट्रातून अठराव्या स्थानी झेप घेत हे घवघवीत सुयश संपादन केले, हे येथे विशेष. उमरेडच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवणारी अभिमानास्पद बाब ठरल्याने तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रियंकाने एमपीएससीच्या माध्यमातून दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी (जेएमएफसी)ची परीक्षा उत्तीर्ण केली. पूर्वाश्रमीची प्रियंका अंबालाल पटेल हिने जीवन विकास कनिष्ठ महाविद्यालयातून बारावीचे शिक्षण घेतल्यानंतर नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज येथून एलएलबीचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. पाच वर्षांचा हा अभ्यासक्रम आटोपल्यानंतर स्वत:ची खासगी तालीम सोबतच अ‍ॅड. संजय खानोरकर यांच्याकडे मदतनीस म्हणूनही प्रियंकाने कामकाज पाहिले. उमरेड तालुक्यातील उदासा येथील अ‍ॅड. राजीव भोंबे यांच्याशी प्रियंका साडेचार वर्षांपूर्वी विवाहबद्ध झाल्या. आणि पक्के ठरले मागील वर्षी सन २०१६ ला मुलगा ‘दक्षेस’ हा केवळ चार महिन्यांचा होता. सातत्याने नऊ वर्षे अ‍ॅडव्होकेट म्हणून कामकाज बघितल्यानंतर अचानकपणे काही महिने या कामकाजाला थांबा मिळणार असल्याची खंत सलत होती. काय करायचे असा प्रश्न सतावत असतानाच न्यायाधीशपदाच्या जागा निघाल्या. झाले, पक्के ठरले. आपण ही परीक्षा द्यायचीच! होती नव्हती पुस्तकांची पाने चाळली. कधी दोन तास, कधी चार तर कधी तासन्तास अभ्यास सुरू केला. एकूण तीन टप्प्यात झालेल्या या परीक्षेत प्रियंकाने बाजी मारली. आई, पती आणि ‘ती’ दोन्ही मुलांचा सांभाळ करीत एमपीएससीची परीक्षा हीच कठीण परीक्षा होती. अशातही प्रियंकाची आई इंदिराबेन यांनी उत्तमरीत्या ही कसरत सांभाळली. पती अ‍ॅड. राजीव भोंबे यांनी वेळोवेळी हिंमत दिली. अभ्यासातील बारकावे सांगितले. मार्गदर्शन केले. वडील अंबालाल यांनीही सहकार्य दिले. याशिवाय तीन वर्षांची चिमुकली ‘निष्ठा’ हिनेही समजूतदारपणा दाखवित प्रियंकाला मदतच केली. तासन्तास वाचनालयात अभ्यासासाठी जावे लागत होते. जात असताना मुले झोपलेली. परत आल्यानंतरही मुले झोपलेलीच! अनेकदा हा प्रसंग अंगावर काटा आणणारा तेवढाच जिव्हारी लागणारा होता. ‘तुला आम्ही त्रास देणार नाही. तू घरीच अभ्यास करीत जा’ हे बोबडे बोल आहेत, ‘निष्ठा’ या चिमुकलीचे. तेव्हा मन हळवं होत होतं. बोचत होतं. तिच्या शब्दात ताकद होती. हिमंत होती. आत्मविश्वास ढळू न देता ठरवलं. आता परीक्षा जिंकायचीच! सोईसुविधा अपुऱ्याच ! यूपीएससी असो अथवा एमपीएससीची परीक्षा यामध्ये विदर्भातील निकालाची टक्केवारी फारच कमी आहे. त्यातही ग्रामीण भागात फारशा सोईसुविधा नाहीत. अभ्यासतंत्रही अवगत नसल्याने येथील विद्यार्थी अक्षरश: भितात. खचून जातात. पात्रता असूनही अपयशी ठरतात, असे एका प्रश्नाच्या उत्तरात प्रियंका म्हणाली. तालुकापातळीवर या अभ्याक्रमांच्या दृष्टीने पाऊल उचलले गेले पाहिजे, असेही ती बोलली. उमरेड येथील अनुभव वाचनालय आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाची भरपूर मदत मिळाल्याचेही तिने सांगितले.