नागपूर : मध्य प्रदेश टायगर फाऊंडेशन व डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.-इंडिया यांच्या संयुक्त सहभागाने ‘वाघ सखा’ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये होते. चित्रकला महाविद्यालयाचे डॉ. सदानंद चौधरी, बी.एन.एच.एस.चे संजय करकरे, जनसंपर्क अधिकारी स्नेहल पाटील, सहायक वनसंरक्षक प्रियंका बरगे, डब्ल्यू.डब्ल्यू.एफ.-इंडियाचे वरिष्ठ प्रकल्प अधिकारी व मानद वन्यजीव रक्षक अजिंक्य भटकर प्रमुख पाहुणे होते.
खुला गट व विद्यार्थ्यांसाठी अशा दोन गटात ७२ स्पर्धकांनी सहभाग घेतला. खुल्या गटात प्रथम क्रमांक स्वाती तुपकरी, द्वितीय अश्विनी आडे, तृतीय तेजस टेकाडे व दिनेश शिरसाट तर उत्तेजनार्थ पुरस्कार अथर्व साल्पेकर व शशीन भोयर यांना विभागून देण्यात आले. विशेष उल्लेखनीय पुरस्कार नीलेश तुपकरी यांना मिळाला. विद्यार्थ्यांच्या गटात प्रथम गायत्री वळसकर, द्वितीय निर्भय कुंभारे व प्रीती भौमिक, तृतीय साकेत सोरते व अक्षिता शिरसाट यांना विभागून देण्यात आला. उत्तेजनार्थ पुरस्कार लक्षिता कजवाडकर, जान्हवी धुमने, सुरभी अलोणी व अद्वैत साल्पेकर यांना देण्यात आला. विशेष उल्लेखनीय पुरस्कार हर्षिता हेलीवाल हिला मिळाला. स्पर्धेसाठी स्पर्धकांना टी-शर्ट वितरित करून त्यावर चित्र रंगविल्यावर संकलित करण्यात आले. यशस्वीतेसाठी आशिष कोहळे, नजीवन चौधरी, पूजा भटकर, आनंद भंडारी यांनी सहकार्य केले.