लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : चिमुकला मुलगा, बहीण, जावयासह पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर हत्याकांडाच्या ३६ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याचे छायाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. त्याची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे.रविवारी मध्यरात्रीनंतर क्रूरकर्मा पालटकरने संपत्तीच्या वादातून जावई कमलाकर मोतीराम पवनकर, बहीण अर्चना, भाची वेदांती आणि जावयाची आई मीराबाई यांच्यासह स्वत:चा चार वर्षीय मुलगा कृष्णा ऊर्फ गणेश विवेक पालटकर याची निर्घृण हत्या केली. सोमवारी सकाळी हे थरारक हत्याकांड उघडकीस आल्यापासून पोलीस या नराधमाचा शोध घेत आहे. त्याचे मूळगाव, नागपूर जिल्हा आणि आजूबाजूला राहणाऱ्या सर्व नातेवाईकांकडे पोलिसांनी धडक दिली. भंडारा आणि अमरावती जिल्ह्यातही पोलीस पोहचले आहे. मात्र तो हाती लागला नाही. त्यामुळे तो परराज्यात पळून गेल्याचा संशय आहे. परिणामी सोमवारी दुपारपासूनच नंदनवन पोलीस, उपायुक्त परिमंडळ चारचे पथक, गुन्हे शाखेची पथके अशी एकूण नऊ पथके त्याचा जागोजागी शोध घेत आहेत. याशिवाय, स्थानिक पोलिसांची वेगळी पथके त्याचा शोध घेत आहेत. आरोपीचे छायाचित्र फेसबुक, व्हॉटस्अॅप, इन्स्टाग्राम आणि व्टिटरवर अपलोड करण्यात आले आहे. आंतरराज्यीय पोलीस समन्वय समितीलाही या क्रूरकर्म्याचा शोध घेण्याबाबत आवाहन करण्यात आले असून, सर्वसामान्यांना तो दिसल्यास त्याची तात्काळ माहिती मिळावी म्हणून त्याच्यावर पोलिसांनी बक्षीस ठेवले आहे. पालटकर दिसताच ८९ ७५७५ ७३०३ किंवा ७९७७७८१९२४ क्रमांकावर कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येणार आहे.
क्रूरकर्मा पालटकरची माहिती देणाऱ्यास बक्षीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:15 AM
चिमुकला मुलगा, बहीण, जावयासह पाच जणांची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा विवेक गुलाब पालटकर हत्याकांडाच्या ३६ तासानंतरही पोलिसांच्या हाती लागला नाही. त्यामुळे त्याचे छायाचित्र पोलिसांनी जारी केले आहे. त्याची माहिती देणाऱ्यास योग्य बक्षीस देण्यात येईल, असेही पोलिसांनी जाहीर केले आहे.
ठळक मुद्देपवनकर कुटूंब हत्याकांड: आरोपीचा छडा नाही : पोलिसांच्या नऊ पथकांकडून तपास