लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये तब्बल ७४ जीवनरक्षक व जीवनोपयोगी औषधे नसल्याची धक्कादायक माहिती काही निवासी डॉक्टरांनीच समोर आणली आहे. मेडिकलमध्ये आवश्यक औषधे उपलब्ध करून दिली जात नसल्याने डॉक्टर अडचणीत येत असून, गरीब रुग्णांना पदरमोड करून औषध विकत घ्यावे लागत आहे. विशेष म्हणजे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोन डॉक्टरांना अटक केल्याने काहींनी बाहेरून औषधे लिहून देणेही बंद केले आहे.मेडिकलमध्ये औषध खरेदीसाठी आवश्यक असलेल्या दर कराराची मुदत पाच महिन्यापूर्वीच संपली. ‘लोकमत’ने याचा पाठपुरावा केल्याने दोन आठवड्यापूर्वी दर कराराला ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिली. मेडिकलने नुकतीच खरेदी प्रक्रिया पूर्ण केली. मात्र औषधांचा पुरवठा होइस्तोवर आणखी एक-दोन महिन्याचा कालावधी लागणार आहे. यामुळे औषधांची बिकट स्थिती निर्माण झाली आहे. यातच रुग्णहित लक्षात घेऊन निवासी डॉक्टर आपल्या अधिकाराबाहेर काम करीत असल्याने व त्याचमुळे लाच प्रकरणाला सामोरे जावे लागल्याने बाहेरून औषधे लिहून देणेच बंद केले आहे. यामुळे रुग्णालयात नवा वाद निर्माण सुरू झाला आहे. काही निवासी डॉक्टरांनी मेडिकलचे वास्तव समोर यावे म्हणून बुधवारी ५५ जीवनरक्षक औषधे व शस्त्रक्रियेसाठी आवश्यक असलेल्या १९ अशी मिळून ७४ औषधे रुग्णालयात उपलब्ध नसल्याची यादीच पत्रकारांना पाठविली आहे. निवासी डॉक्टरांच्या या संतापामुळे मेडिकलमधील अनेक प्रकार चव्हाट्यावर येण्याची शक्यता आहे.-हृदयविकाराचा झटका आल्यानंतर देण्यात येणारे इंजेक्शनही नाहीनिवासी डॉक्टरांनी उपलब्ध करून दिलेल्या यादीत इंजेक्शन टेक्जिमसह सहा अॅन्टीबायोटिक इंजेकशन, हृदयविकाराचा झटका आल्यानंतर रुग्णाला देण्यात येणारे नायट्रो गिलीसिरीन, एड्रिनालीन, नोरएड्रिनालीन हे इंजेक्शनही नाहीत, शिवाय पेनटॉप अॅन्टीअॅसिड, पक्षाघाताच्या रुग्णांसाठी सिपकाईनिस, गर्भवती महिलांना दिले जाणारे इंजेक्शन आॅक्सीटोसिनही नाही. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारे साधे ग्लोव्हजही रुग्णालयात नाहीत. ब्लड ट्रान्सफ्युजन सेट, कोमाच्या रुग्णांसाठी लागणारे इंडोट्रेसिल ट्यूब आणि अस्थमाचा अटॅक आलेल्या रुग्णांसाठी आलेले ‘नेवोलाईजेशन सेट’ही उपलब्ध नाहीत.
नागपुरात औषधांच्या तुटवड्यामुळे गरीब रुग्ण अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 8:44 PM
गरीब रुग्णांसाठी आशेचा किरण असलेल्या मेडिकलमध्ये तब्बल ७४ जीवनरक्षक व जीवनोपयोगी औषधे नसल्याची धक्कादायक माहिती काही निवासी डॉक्टरांनीच समोर आणली आहे.
ठळक मुद्देमेडिकल : ७४ जीवनरक्षक औषधे नसल्याची यादीच निवासी डॉक्टरांनी दिली