शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: विधानसभेसाठी वंचितचा धमाका; ११ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
2
"गोली का जवाब गोले से...!"; गृह मंत्री अमित शाह यांची कश्मिरात गर्जना; विरोधकांवरही निशाणा
3
"या तीन घराण्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशत पसरवली" अमित शाहांचा विरोधकांवर हल्लाबोल
4
जरांगेंच्या तालावर मुख्यमंत्री नाचतात; ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
5
IND vs BAN : डोळ्याची पापणी लवण्याच्या आत खेळ खल्लास! यशस्वीनं घेतलेला भन्नाट कॅच बघाच (VIDEO)
6
"काशीचा प्रसाद मिळाला, तेव्हा माझ्या मनात तिरुपतीचा विचार आला", लाडू वादावर माजी राष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता
7
IND vs BAN : Rishabh Pant चे झंझावाती शतक! गर्लफ्रेंड ईशाने मानले आभार, म्हणाली...
8
LLC 2024 : इरफान पठाणची जादू अन् विजयी सलामी; जुन्या आठवणींना उजाळा, भज्जीचा संघ हरला
9
BSNL नं जिओ, एअरटेल, Vi ला दिला 'जोर का झटका'; एकाच महिन्यात वाढले लाखो ग्राहक
10
'खोसला का घोसला'मधील लोकप्रिय अभिनेत्याचा भीषण अपघात, ICU त उपचार सुरु
11
काय सांगता! ६०० ब्राह्मण करतात तिरुपतीचा प्रसाद; १ लाख लाडू रामलला चरणी केले होते अर्पण
12
Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स
13
"पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाचा मृत्यू झाला असता तर आरोपीला ३० मिनिटांत जामीन दिला असता का?"
14
हिज्बुल्लाहची झोप उडवणाऱ्या कंपनीची CEO असणारी ही फिल्मी महिला आहे तरी कोण? 
15
तिरुपती बालाजींवर कुबेराचे ऋण; आजही भाविक फेडतात कर्ज! वाचा, लाडू प्रसादम अद्भूत गोष्टी
16
IND vs BAN : शुबमन गिलची कमाल! शतकी खेळीसह द्रविड-कोहलीसह रुट-बाबरला धोबी पछाड!
17
पॅसेन्जरच्या जेवणात निघाला जिवंत उंदीर, कराव लागलं विमानाचं इमरजन्सी लॅन्डिंग; नेमकं काय घडलं?
18
पितृपक्षात महालक्ष्मी गजकेसरी योग: ९ राशींना वरदान काळ, सर्वोत्तम संधी; लाभच लाभ, शुभ होईल!
19
मशिदीचे अतिक्रमित बांधकाम स्वतःहून काढण्यासाठी विश्वस्तांनी मागितली मुदत
20
३ महिन्यांपासून थंडावलेले डिफेन्स कंपन्यांचे स्टॉक्स; आता जोरदार तेजी; एकात लागलं अपर सर्किट

हवामान बदलाच्या संकटात उत्पादक पशुधनाची निर्मिती काळाची गरज

By निशांत वानखेडे | Published: February 13, 2024 9:37 PM

अनिलकुमार श्रीवास्तव : 'माफसू'चा ११ वा दीक्षांत समारंभ थाटात

 नागपूर : हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढीचे धाेके नजिकच्या काळात प्रचंड वाढले आहेत. पशुधनाचे उत्पादन व वाढ कमी हाेणे, पुनरुत्पादक कार्यक्षमता कमी हाेणे, दुध व मांस उत्पादनात घट हाेण्यास पशुधनाच्या आराेग्याचे धाेके वाढण्याच्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी बदलाला टिकून राहून उत्पादकता जपणाऱ्या पशुधनाची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन पंडित दीनदयाल उपाध्याय पशुचिकित्सा विद्यापीठ, मथुराचे कुलगुरू व गौ संशाेधन संस्थेचे प्रमुख डॉ. प्रा. अनिलकुमार श्रीवास्तव यांनी केले.

महाराष्ट्र पशु एवं मत्स्य विज्ञान विद्यापीठ(माफसू)चा ११वा पदवीदान समारंभ मंगळवारी वसंतराव देशपांडे सभागृहात पार पडला. याप्रसंगी माफसूचे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, कुलसचिव डॉ. नितीन कुरकुरे, डॉ. शिरीष उपाध्ये, सुधीर दिवे आदी मान्यवर उपस्थित हाेते. महाराष्ट्राचे राज्यपाल व कुलपती रमेश बैस हे आभासी माध्यमाने समारंभात सहभागी झाले. डाॅ. श्रीवास्तव म्हणाले, भविष्यात पशुधनाच्या संख्येपेक्षा त्यांच्या दरडाेई उत्पादन क्षमतेवर भर द्यावा लागेल. वाढती लाेकसंख्या लक्षात घेता पाैष्टिक भाेजन आणि प्रथिनांची गरज पूर्ण करणे वर्तमानात जगासमाेर आव्हान असल्याची भावना व्यक्त केली. विकसनशील देशात गरिबी कमी करण्यासाठी भरपूर व सुरक्षित पशू आहार उत्पादित करणे गरजेचे आहे. जगाची मांस व दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी विकसनशील देशांनी पुढच्या २० वर्षांत पशुधन उत्पादन दुप्पट वाढविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. पशुधन आराेग्य सुरक्षित करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयाेग व्हावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्यपाल रमेश बैस यांनी कृषी क्षेत्रात हरितक्रांती, दुग्ध उत्पादनात श्वेत क्रांती, डाळीच्या उत्पादनात पिवळी क्रांती, मत्स्य उत्पादनाची निळी क्रांती व मांस उत्पादन वाढीची लाल क्रांती, अशा इंद्रधनुषी क्रांत्यामुळे भारत खाद्य उत्पादनात आत्मनिर्भर झाल्याचे ते म्हणाले.

दीक्षांत समारंभात २०२१-२२, २०२२-२३ आणि २०२३-२४ या शैक्षणिक सत्रातील १७६९ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. यामध्ये १३४० पदवी प्राप्त, ३९९ पदव्युत्तर आणि ३० डाॅक्टरेटचा समावेश आहे. सर्वाेत्तम शैक्षणिक कामगिरीसाठी विद्यार्थ्यांना ९५ पदके व ३ राेख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

प्रज्वल चापलेला ४ सुवर्ण, ३ रजत पदकदीक्षांत समारंभात नागपूरच्या पशुवैद्यक महाविद्यालयाचा प्रज्वल चापले या विद्यार्थ्याला २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात सर्वाेत्तम कामगिरीसाठी ४ सुवर्ण पदक व ३ रजत पदकांनी गाैरविण्यात करण्यात आले. २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात मुंबई वेटर्नरी महाविद्यालयाची महिमा गुलाटी या विद्यार्थिनीने ३ सुवर्ण पदक व राेख पुरस्कार प्राप्त केला. मुंबईचीच कनिष्का खेमानी या विद्यार्थिनीने ५ सुवर्ण पदके व राेख पुरस्कार प्राप्त केला. २०२३-२४ या सत्रासाठी शिरवळचा प्रणव व्यवहारेला दाेन सुवर्ण पदक प्राप्त झाले.

२०२१-२२ या सत्रासाठीनागपूर महाविद्यालयाची याेगिती गमेला दाेन सुवर्ण पदक, उद्गीरची नबारका चंदाला दाेन सुवर्ण, एक राैप्य पदक, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यक महाविद्यालयाचा चंदेश साेनीला सुवर्ण व राैप्य पदक, प्रणव जाधवला राैप्य, परभणी काॅलेजचा समाधान गरांडेला सुवर्ण, मुंबईची रिचा चिकणकर सुवर्ण, नागपूरची शिवानी करपे सुवर्ण, मनाेज डाेनाडकर सुवर्ण, मुंबईची वृषाली ब्राम्हणकरला राैप्य पदक मिळाले.

२०२२-२३ सत्रासाठी

नागपूरचा अभिनव साेनटक्केला दाेन सुवर्ण व दाेन राैप्य पदक, निलय देशपांडे सुवर्ण पदक, शिवानी साखरे सुवर्ण पदक, नेहा शेखावत सुवर्ण पदक, शिरवळची पायल निर्मलला सुवर्ण, उद्गीरचा आकाश चॅटर्जी सुवर्ण व राैप्य पदक, मुंबईची आदिल गिआरा रिआला सुवर्ण व राैप्य, परभणीचा अन्ना रामला राैप्य पदक, शिरवळचा दीक्षित कुमारला सुवर्ण, युवराज वाडेकरला राैप्य, परभणीची मणिका जाधवला सुवर्ण, शिरवळची श्रुती मेहंदळेला सुपर्ण पदक प्राप्त झाले.

२०२३-२४ वर्षासाठीमुंबईची गायत्री जयराज सुवर्ण व राेख पारिताेषिक, शिरवळच्या वैष्णवी देवकर व विना सुतारला सुवर्ण पदक, मुंबईची स्वप्नाली सुतारला सुवर्ण, शिरवळची माेनिका साेनारला सुवर्ण, नागपूरची मनस्वी दुधेला सुवर्ण व दाेन राैप्य पदके, विवेक चंद्रापुरेला सुवर्ण, अनमाेल ताेमरला सुवर्ण, उद्गीरची नव्या गहलाेतला राैप्य पदक, मुंबईची नेहा धाेंगडेला सुवर्ण, नागपूरची मानसी चाैधरीला सुवर्ण, शिरवळची स्नेहा काेरेला दाेन राैप्य पदक, नागपूरची शिल्पा राठाेडला सुवर्ण पदक, शिरवळचा अक्षय पुजारी राैप्य, उद्गीरचा प्रवीण मडभावी सुवर्ण व परभणीची पुजा फरांदेने सुवर्ण पदक प्राप्त केले.

दुग्ध तंत्रज्ञान विद्याशाखा

२०२१-२२ शैक्षणिक सत्रासाठी वरुडचया दुग्ध तंत्रज्ञान महाविद्यालयाचा अनिकेत राठाेडला तीन सुवर्ण पदके व उद्गीरची पायल पुडकेला सुवर्ण पदक प्राप्त झाले.२०२२-२३ सत्रासाठी वरुडचा अक्षय ढाेरेला तीन सुवर्ण व तेजस्वी वानखेडेला एक सुवर्ण पदक प्राप्त झाले.

- मत्स्य विज्ञान विद्याशाखेत २०२१-२२ सत्रात नागपूरचा प्रथमेश आडे आणि २०२२-२३ या सत्रात उद्गीरची रुतूजा भालकेला सुवर्ण पदक प्राप्त झाले.

टॅग्स :nagpurनागपूर