लाेकमत न्यूज नेटवर्क
वेलतूर : परिसरातील धामणा येथे दारुबंदीसाठी गावातील महिलांनी एल्गार पुकारला आहे. धामणा गावात अवैध दारूविक्री सर्रास हाेत असल्याने लहान मुले व्यसनाधीन हाेत आहेत. शिवाय गावात चाेरीच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे गावात दारूबंदी करा, अशी मागणी करीत बचतगटाच्या महिलांनी वेलतूर पाेलीस ठाण्यात सहायक पाेलीस निरीक्षक नितेश डाेर्लीकर यांच्याकडे निवेदन साेपविले आहे.
धामणा गावात खुलेआम अवैध दारूविक्री हाेत असल्याने लहान मुले व तरुण व्यसनाच्या आहारी जात आहेत. दुसरीकडे गावात चाेरीच्या घटना वाढल्या असून, कुटुंबात भांडण-तंट्याचे प्रमाण वाढत आहे. कुटुंबातील प्रमुख व्यक्ती घरातील अन्नधान्य विकून दारूचे व्यसन पूर्ण करीत आहे. कुटुंब प्रमुखाकडूनच महिलांना मारहाण व शिवीगाळ करण्याचा प्रकारसुद्धा वाढला आहे. यामुळे गावातील महिला त्रस्त झाल्या आहेत.
तसेच गावातील शासकीय मालमत्तेची चाेरी हाेण्याचे प्रमाण वाढले आहे. लाेखंडी पाईप, विद्युत खांबाचे लाईट व इतर वस्तू चाेरून दारूचे व्यसन भागविले जात आहे. असे असतानाही गावातील काही जण गावात खुलेआम दारूची अवैध विक्री करीत आहेत. त्यामुळे धामणा येथे तत्काळ दारूबंदी करण्याची मागणी महिलांनी निवेदनातून केली आहे. यासंदर्भात सहायक पाेलीस निरीक्षक नितेश डाेर्लीकर यांना निवेदन देण्यात आले. यावेळी समीक्षा गणवीर, पिंकी राेडगे, मंगला कुंभरे, गीता कुंभरे, लता इवनते, अन्नपूर्णा धुर्वे, कुंदा सिडाम, सविता उईके, कल्पना धुर्वे, रेखा इनवते, शाेभा लाेणारे, सुनीता मांढरे, कांता गवळी आदींसह गावातील महिलांची उपस्थिती हाेती.